हिवाळ्याची चाहूल लागली की थंडीबरोबर अनेक आजारही वाढतात. विशेषतः हृदयविकाराचे (heart)प्रमाण या काळात वाढताना दिसते. डॉक्टरांच्या मते, हिवाळ्यात रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्त घट्ट होते, ज्यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येतो. परिणामी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.तज्ज्ञांच्या मते, हिवाळा सुरू होताच हृदयाशी संबंधित रुग्णांमध्ये अचानक वाढ होते. कारण या काळात शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे आधीपासून हृदयविकार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

थंडीच्या दिवसांत लोक सकाळी व्यायाम टाळतात आणि घराबाहेर पडणे कमी करतात. अशावेळी शरीरातील लाल रक्तपेशी एकत्र येऊन रक्ताभिसरणात अडथळा निर्माण होतो. परिणामी, हृदयाला (heart)पुरेसे रक्त मिळत नाही आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.याशिवाय, थंडीत अयोग्य आहार घेण्याची सवयही मोठे संकट बनते. सॅच्युरेटेड फॅट, ट्रान्स फॅट, रिफाइंड तेल आणि सोडियमयुक्त अन्नपदार्थांचे सेवन वाढल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. त्यामुळे ब्लॉकेज होण्याचा धोका वाढतो आणि परिणामी हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
तज्ज्ञांच्या मते, हृदयविकाराचा धोका केवळ हिवाळ्यातच नव्हे तर उन्हाळ्यातही वाढतो. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने रक्त घट्ट होते आणि प्रवाहात अडथळा निर्माण होतो. मात्र, हिवाळ्यात ही समस्या अधिक गंभीर असते. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी नियमित योग, प्राणायाम, ध्यान आणि हलकी हालचाल करणे अत्यंत गरजेचे आहे. संतुलित आहार, उबदार कपडे आणि नियमित आरोग्य तपासणी यामुळेही हृदयाचे आरोग्य टिकवता येते. या थंडीच्या काळात थोडी काळजी घेतली, तर हृदय निरोगी राहू शकते.

हेही वाचा :
सोने झालं स्वस्त, चांदी महागली! जाणून घ्या आजचे ताजे दर
धक-धक गर्लचा सर्वात वादग्रस्त पण सुपरहिट डान्स, एका आठवड्यात विकल्या 1 कोटी कॅसेट्स
सावधान, गुगलचा इशारा! मोफत वाय-फाय वापरताय? हॅकर्स करू शकतात तुमचा डेटा हॅक