आयपीएल चा हंगाम जवळ येत असताना मुंबई इंडियंसने(Indians) ट्रेड मार्केटमध्ये सर्वांत जलद आणि सर्वांत आक्रमक मूव्ह करत क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. शार्दुल ठाकुरची एन्ट्री करून MI ने पहिला मोठा स्फोट केला आणि त्यानंतर काही तासांतच त्यांनी वेस्ट इंडीजचा धडाकेबाज लेफ्ट-हँड पॉवरहिटर शेरफान रदरफोर्डलाही आपल्या छावणीत आणले. यामुळे आगामी हंगामात मुंबईची मिडल ऑर्डर अधिक दमदार दिसणार आहे.गुजरात टायटन्सने रदरफोर्डला IPL 2025 हंगामापूर्वी 2.6 कोटींमध्ये खरेदी केले होते. त्याची क्षमता, स्ट्राइक रेट आणि डेथ ओव्हर्समध्ये सामने फिनिश करण्याची ताकद पाहता MI नेही त्याला हाच दर देत संघात सामील केले आहे. ही डील MI च्या ट्रेड स्ट्रॅटेजीचा मोठा भाग मानली जात आहे.

IPL 2025 हा रदरफोर्डसाठी महत्त्वाचा वर्ष होता. गुजरातकडून खेळताना त्याने 13 सामन्यांत 291 धावा फटकावल्या. त्याचा स्ट्राइक रेट 157 च्या पुढे पोहोचला होता, जो टी20 लीगच्या मानाने अत्यंत प्रभावी मानला जातो. अनेक प्रसंगी त्याने अंतिम ओव्हर्समध्ये मोठे शॉट्स खेळत संघाला चांगली फिनिश दिली.त्याचे षटकार मारण्याचे कौशल्य, स्पिनविरुद्ध निडर खेळ आणि पेसर्सविरुद्ध बॅकफुटवरून जबरदस्त हिटिंग ही सर्व कारणे MI ला आकर्षित करणारी ठरली.शार्दुल ठाकुरच्या ट्रेडची घोषणा झाल्यानंतर MI चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली होती की पुढचा मोठा टार्गेट कोण असणार? आणि नेमकं त्याचवेळी रदरफोर्डचा ट्रेड निश्चित झाल्याने टीम मॅनेजमेंट या हंगामात अत्यंत आक्रमक पद्धतीने स्क्वाड तयार करत असल्याचे स्पष्ट झाले.
शार्दुल ठाकुर LSG सोडून मुंबईकडे येत आहे आणि तो बॉलिंग अॅटॅकला ऑलराउंडरचा मजबूत पर्याय देईल; तर रदरफोर्ड मिडल ऑर्डरमध्ये स्फोटकता वाढवेल.

रदरफोर्डने IPL मध्ये आतापर्यंत 23 सामने खेळले असून त्यात त्याच्या नावावर 397 धावा आहेत. पहिल्यांदाच तो MI च्या जर्सीत उतरतोय असे नाही. IPL 2020 हंगामात तो आधीच मुंबईचा भाग राहिला आहे. त्या वेळी त्याने 7 सामन्यांत 73 धावा केल्या होत्या.त्या सीझननंतर काही वर्षे तो दिल्ली कॅपिटल्स आणि RCB कडून खेळला, पण त्याच्या आक्रमक खेळामुळे तो पुन्हा एकदा MI च्या नजरेत आला.वेस्ट इंडीजसाठी (Indians)खेळताना रदरफोर्डने टी20 फॉरमॅटमध्ये आपली ओळख एक हार्ड-हिटर म्हणून निर्माण केली आहे.44 टी20 इंटरनॅशनल सामन्यांत त्याच्या नावावर 588 धावा आहेत स्ट्राइक रेट – 137.38 अनेक प्रसंगी त्याने कॅरेबियन टीमसाठी निर्णायक खेळी करत सामने वाचवले आहेत. 19 ODI सामन्यांत 656 धावा एक शतक आणि 9 दमदार अर्धशतके यामुळे IPL मध्येही त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवणे स्वाभाविक आहे.

सूर्यकुमार यादव, इशान किशन, टिम डेविड यांसारखे व्यतिगत मॅच-विनर असताना रदरफोर्डची एन्ट्री मिडल ऑर्डरमध्ये एक्स्ट्रा फायरपावर देईल. विशेषतः डेथ ओव्हर्समध्ये मोठे शॉट्स मारण्याची क्षमता MI ला अनेक सामन्यांत मदत करू शकते.
आता IPL 2026 च्या लिलावापूर्वी टीम कशा आणखी खेळी करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण MI च्या आतापर्यंतच्या ट्रेड डील्स पाहता एक गोष्ट स्पष्ट की, मुंबई या हंगामात ‘सुपर आक्रमक मोड’मध्ये आहे.

हेही वाचा :

हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका वाढतो! जाणून घ्या कारणे आणि उपाय

पुन्हा विसरलात Wi-Fi चा पासवर्ड? Don’t Worry… अँड्रॉईड असो किंवा आयफोन, फक्त फॉलो करा या स्टेप्स

सोने झालं स्वस्त, चांदी महागली! जाणून घ्या आजचे ताजे दर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *