आजच्या काळात वायफाय ही प्रत्येकाची गरज आहे. स्मार्टफोन, स्मार्ट टिव्ही, लॅपटॉप, कंम्प्युटर आणि इतर अनेक गॅझेट्स चालवण्यासाठी वायफायची गरज असते. वायफायमध्ये (password)तुम्ही अनलिमिटेड इंटरनेटचा वापर करू शकता. त्यामुळे हल्ली तुम्हाला अनेक घरांमध्ये वायफाय लावल्याचे पाहायला मिळते. तुम्ही देखील तुमच्या घरी वायफाय लावला असेल. वायफायच्या मदतीने अनेक गॅझेट्स एकाचवेळी वापरणं अत्यंत सोपं होतं. कधी पाहुणे किंवा मित्र घरी आले तर आपण त्यांच्या फोनला देखील वायफाय कनेक्ट करून देतो.

असं अनेकदा घडतं की, जेव्हा एखादा मित्र घरी येतो आणि तो वायफायचा अॅक्सेस मागतो. नेमकं अशावेळी आपल्याला पासवर्ड(password) देखील आठवत नाही. तर काहीवेळा पासवर्ड इतका किचकट असतो की तो टाईप करताना देखील वैताग येतो. अशावेळी जर तुमच्याकडे आयफोन असेल आणि समोर अँड्रॉईड युजर असेल तर ही परिस्थिती आणखी कठीण होते. मात्र आता असं होणार नाही. कारण आता आम्ही तुम्हाला काही अशा सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही आयफोनवरून अँड्रॉईडवर आणि अँड्रॉईडवरून आयफोनवर पासवर्ड शेअर करू शकणार आहेत. याची प्रोसेस अतिशय सोपी आहे. याच प्रोसेसबद्दल आता जाणून घेऊया.
आयफोनवरून अँड्रॉईड स्मार्टफोनवर पासवर्ड शेअर करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या आयफोनवरूनअँड्रॉईड स्मार्टफोनवर पासवर्ड शेअर करू शकणार आहात.यासाठी सर्वात आधी आयफोने सेटिंग ओपन करा आणि वायफाय ऑप्शनवर टॅप करातुम्ही तुमच्या आयफोनमध्ये जे नेवटर्क कनेक्ट केले आहे, त्याच्या बाजूला दिसणाऱ्या i आयकॉनवर टॅप करा. इथे तुम्हाला वायफायचं नाव दिसणार आहे, पासवर्ड नाही.पासवर्ड पाहण्यासाठी Password वर टॅप करा आणि फेस आयडी किंवा टच आयडीने ऑथेंटिकेट करा.
आता तुम्हाला स्क्रीनवर पासवर्ड दिसेल. हा पासवर्ड तुम्ही कॉपी करून तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता.यानंतर तुमचे मित्र पासवर्ड पेस्ट करून वायफाय कनेक्ट करू शकता.याशिवाय दुसरी सोपी पद्धत म्हणजे तुम्ही वायफाय डिटेल्स QR कोडद्वारे देखील शेअर करू शकता. यासाठी Shortcuts अॅप किंवा एखाद्या फ्री QR जनरेट वेबसाईटवर जा, तुमच्या नेटवर्कची माहिती तिथे पेस्ट करा आणि हा QR कोड तुमच्या मित्रांना स्कॅन करायला सांगा.
अँड्रॉईडवरून आयफोनवर पासवर्ड कसा शेअर करायचा?
अँड्रॉईडमध्ये ही प्रोसेस आणखी सोपी आहे. तुम्हाला केवळ खाली दिलेल्या काही सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत यानंतर तुम्ही अँड्रॉईडवरून आयफोनवर पासवर्ड शेअर करू शकणार आहात.सर्वात आधी सेटिंग ओपन करा आणि नेटवर्क आणि इंटरनेट हा पर्याय निवडा.यानंतर इंटरनेटवर टॅप करा आणि तुम्ही कनेक्ट असलेला वायफाय नेटवर्क ओपन करा.इथे तुम्हाला QR कोडचं ऑप्शन दिसणार आहे, त्यावर टॅप करा.आता तुमच्या आयफोनवाल्या मित्राला कॅमेरा किंवा स्कॅनरने हा QR कोड स्कॅन करायला सांगा.यानंतर काही क्षणातच तुमच्या मित्राला देखील वायफायचा अॅक्सेस मिळणार आहे.

हेही वाचा :
सोने झालं स्वस्त, चांदी महागली! जाणून घ्या आजचे ताजे दर
धक-धक गर्लचा सर्वात वादग्रस्त पण सुपरहिट डान्स, एका आठवड्यात विकल्या 1 कोटी कॅसेट्स
सावधान, गुगलचा इशारा! मोफत वाय-फाय वापरताय? हॅकर्स करू शकतात तुमचा डेटा हॅक