अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी नेहमीच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत लो-प्रोफाइल राहतो. तरीही सोशल मीडियाच्या काळात चर्चांना उधाण येणं थांबत नाही. काही दिवसांपासून अहान एका मराठी अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्या अभिनेत्री म्हणजे टीव्ही आणि मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय नाव जिया शंकर.जिया आणि अहान अनेकदा एका ठिकाणी दिसले, सोशल मीडियावरील काही पोस्ट्समुळेही चाहत्यांमध्ये चर्चा रंगली. मात्र या सर्व अंदाजांना विराम देत अखेर अहान शेट्टीच्या टीमने अधिकृत विधान जारी केले आहे. टीमने स्पष्टपणे म्हटले की, “या डेटिंगच्या(dating) अफवा पूर्णपणे खोट्या आहेत. अहान सध्या कोणासोबतही रिलेशनशिपमध्ये नाही. तो पूर्णपणे त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे.”

अहानच्या टीमनुसार सध्या त्याच्या हातात अनेक मोठे प्रकल्प आहेत, ज्यामध्ये ‘बॉर्डर 2’ या महत्वाकांक्षी चित्रपटाचा समावेश आहे. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून शूटिंगची तयारी जोरात सुरू असल्याचे सांगितले गेले आहे.दुसरीकडे, जिया शंकर ही टीव्ही आणि मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री (dating)आहे. ‘पिशाचिनी’, ‘काटेलाल अँड सन्स’, ‘व्हर्जिन भास्कर’ यांसारख्या मालिकांमधून तिने ओळख निर्माण केली. तिने रितेश–जेनेलिया देशमुखसोबत मराठी चित्रपट ‘वेड’ मध्येही काम केले आहे. तसेच ‘बिग बॉस ओटीटी 2’ मधील सहभागामुळे तिला आणखी मोठी लोकप्रियता मिळाली.
अहानचं नाव जिया सोबत जोडण्यापूर्वी तो दीर्घकाळ तानिया श्रॉफसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. दोघेही सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर करायचे, मात्र आता त्यांचं नातं संपल्याचं बोललं जात असून या ब्रेकअपचं कारण अद्याप उघड झालेले नाही.अहान–जिया डेटिंगबाबतच्या अफवा अखेर खोट्या ठरल्या असून या प्रकरणामुळे चाहत्यांमध्ये झालेला संभ्रम आता दूर झाला आहे.

हेही वाचा :
हिवाळ्यात बऱ्याच दिवस पालेभाज्या राहतील फ्रेश, फॉलो करा या खास टिप्स
‘तोंड फोडून टाकेन..’, पापाराझींवर भडकल्या जया बच्चन, दिली वॉर्निंग
बिहार निवडणूक निकालांचा शेअर बाजारावर तगडा परिणाम