बॉलिवूडमध्ये या वर्षात अनेक सेलिब्रिटी जोडप्यांनी आई-बाबा होण्याची आनंदाची बातमी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच कतरिना कैफ आणि विकी कौशल आई-बाबा (father)बनले होते. आता आणखी एक प्रसिद्ध जोडपं पॅरेंट्स क्लबमध्ये सामील झाले आहे.अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा यांनी आज, 15 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांच्या घरी गोंडस मुलीचा जन्म झाल्याची आनंददायी बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. पत्रलेखाने एका गोड मुलीला जन्म दिला असून त्यांनी त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून चाहते आणि चाहत्यांबरोबर ही खुशखबर शेअर केली.

त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “आमच्या लग्नाच्या चौथ्या वाढदिवशी देवाने आम्हाला हे सर्वात सुंदर गिफ्ट, आशिर्वाद दिलेत.” आज म्हणजे त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असून, या खास दिवशीच त्यांच्या लेकीचाही जन्म झाल्याने आनंद द्विगुणीत झाला आहे. राजकुमार राव आणि पत्रलेखाच्या या खुशखबरवर(father) चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रेमाचा वर्षाव केला असून, दोघांनाही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी ‘Baby on the Way’ असा पोस्ट शेअर करून आई-बाबा होणार असल्याचे संकेत दिले होते.
राजकुमार राव त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात आणि अनेक चित्रपटांमध्ये त्यांचा अभिनय प्रेक्षकांना मनाला भिडतो. पत्रलेखा हिनेही अनेक चित्रपटांत अभिनयाची छाप पाडली आहे. या दोघांनी पहिल्यांदा एकत्र ‘सिटीलाइट्स’ चित्रपटात काम केले, त्यानंतर जवळपास 11 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहून अखेर 15 नोव्हेंबर 2021 रोजी पारंपरिक बंगाली पद्धतीने चंदीगड येथे लग्नगाठ बांधली.आज त्यांच्या आयुष्यातील सर्वात खास दिवशी त्यांच्या लेकीचा जन्म झाल्याने बॉलिवूडमध्ये त्यांच्या चाहत्यांसाठीही हा दिवस आनंदाचा बनला आहे.

हेही वाचा :
आज शनिवारच्या दिवशी या राशींवर होणार धनवर्षाव…
अंगावर जिवंत सापांना गुंडाळून मॉडेलने रेड कार्पेटवर मारली धमाकेदार एंट्री, पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral
आता येताय Airless Tyres, ‘अशाप्रकारे’ ड्रायव्हर आणि प्रवाशी राहतील सुरक्षित