वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे,(inauspicious) ज्यामध्ये तुमच्या वास्तु अर्थात घराशी संबंधित शुभ-अशुभ विचार सांगितले आहेत. हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. धर्मशास्त्रानुसार जर तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्रानुसार नसेल तुमच्या आयुष्यात अनेक संकटं येऊ शकतात. जसं की अकस्मात धन हानी, वारंवार आजारी पडणे यासारख्या समस्या तुमच्या आयुष्यात येऊ शकतात.

वास्तुशास्त्रामध्ये तुमचं घर कसं असावं? तुमच्या घराची रचना कशी असावी? स्वयंपाक घर, बेडरूम, देवघर यांची दिशा कोणती असावी? घराच्या मुख्य दरवाजाचं तोंड कोणत्या दिशेला असावं? यासारख्या अनेक गोष्टी सांगितल्या आहोतच, सोबतच घारत कोणत्या गोष्टी ठेवणं शुभ आहे? कोणत्या गोष्टी अशुभ आहेत? हे देखील सांगतिलं आहे.
दरम्यान अनेकदा आपल्यासोबत असं होतं, की आपण खूप कष्ट करतो, प्रचंड पैसा कमावतो परंतु तो आपल्या हातात टिकत नाही? यावर देखील वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. (inauspicious) वास्तुशास्त्रानुसार घरात अशा तीन जागा असतात जिथे पैसै कधीही ठेवू नये, ज्यामुळे तुम्ही कर्जबाजारी होण्याची शक्यता असते. जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगीतलं आहे.

अंधारी जागा – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराचा असा भाग जिथे सतत अंधार असतो अशा ठिकाणी तुम्ही चुकूनही तिजोरी ठेवू नका, त्यामुळे तुमच्या घरात पैसा टिकत नाही.
शौचालयाला लागून असलेली भिंत – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात जिथे शौचालय आहे, त्याला लागून असलेल्या भिंतीच्या शेजारी कधीही तिजोरी ठेवू नये, ते अशुभ मानलं जातं.
दक्षिण दिशा – वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते, त्यामुळे दक्षिण दिशेला तिजोरी ठेवणं अशुभ मानलं गेलं आहे.तिजोरी ठेवण्यासाठी उत्तम जागा कोणती? (inauspicious) वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही ऊर्जेची आणि धनाची दिशा असते, तुम्ही तुमची तिजोरी उत्तर दिशेला ठेवू शकतात.
हेही वाचा :
शेतकऱ्यांचा बुधगावात मेळावा; राजू शेट्टी, सतेज पाटील राहणार उपस्थित
“130 किमी रेंजसह दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; फक्त ₹81,000 मध्ये विक्रीला
जगातील सर्वात भयानक शापित गाव, इथे जाताच लोकांच्या बनतात बाहुल्या