अभिनेत्री गिरिजा ओक सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. निळ्या साडीतील तिच्या काही फोटोंनी तिला रातोरात नॅशनल क्रश बनवलं. अचानक मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे आनंदी असतानाच, काही अनुचित कृतींमुळे तयार झालेल्या परिस्थितीने ती तितकीच व्यथितही झाली आहे. गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर तिचे AI-मॉर्फ्ड अश्लील फोटो(photos) आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत, याबाबत तीने व्यक्त केलेली चिंता आता सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.गिरिजा ओकने एक्सवर पोस्ट केलेल्या व्हिडीओद्वारे या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं. “मला खूप प्रेम मिळतंय, मी मिम्स पण बघतेय… पण काही फोटो आणि व्हिडीओ इतके अश्लील आहेत की ते मी पाहूही शकत नाही. AI चा दुरुपयोग करून माझे चेहेरे लावले जात आहेत. हे अतिशय त्रासदायक आहे,” असं गिरिजा स्पष्ट म्हणाली.

गिरिजाने सांगितलं की सोशल मीडियावर मिळणाऱ्या प्रेमाबरोबरच काही अश्लील कंटेंटमुळे ती खूप अस्वस्थ झाली आहे. “काही मिम्स मजेदार आहेत, पण काही इतके घाणेरडे आहेत की ते पाहवत नाहीत. माझे AI-मॉर्फ्ड फोटो आणि व्हिडीओ लोक व्हायरल करत आहेत. हे थांबायला हवं,” असे आवाहन तिने केले(photos).तिने यावेळी केवळ फोटो बनवणाऱ्यांनाच नव्हे तर असे फोटो पाहणाऱ्या आणि शेअर करणाऱ्यांनाही दोषी ठरवलं. “क्लिक्स मिळवण्यासाठी अश्लीलता पसरवणं हा गुन्हाच आहे. या गोष्टी इंटरनेटवर कायम राहतात. त्यामुळे कोणालाही नुकसान होऊ शकतं,” असं तीने सांगितलं.
गिरिजा ओकचे वक्तव्य विशेषतः तिच्या 12 वर्षांच्या मुलाबद्दलच्या काळजीमुळे अधिक भावनिक झालं. “माझा मुलगा सध्या सोशल मीडिया वापरत नाही. पण उद्या जेव्हा तो वाढेल आणि इंटरनेटवर हे फोटो दिसले तर? त्याला हे खोटं नसल्यासारखं वाटू शकतं… ही कल्पनाच मला घाबरवते,” असं तीने सांगितलं.तिने पुढे सांगितलं, “मला माझ्या मुलाची चिंता वाटते. ही परिस्थिती प्रचंड भयानक आहे. त्यामुळे कोणताही AI-मॉर्फ्ड फोटो किंवा व्हिडीओ शेअर करण्यापूर्वी एकदा तरी विचार करा. एखाद्याच्या आयुष्यावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.”
सध्या गिरिजा ओकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तिच्या स्पष्ट, निर्भीड आणि भावनिक प्रतिक्रिया पाहून अनेकांनी तिच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी सिनेविश्वात स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण करणारी गिरिजा, तिच्या या वक्तव्यामुळे आता डिजिटल सुरक्षेबद्दल जागरूकता निर्माण करणारी आवाज ठरत आहे.

हेही वाचा :
पीएम मोदी 11 कोटी शेतकऱ्यांना गिफ्ट देणार, या दिवशी बँक खात्यात जमा होईल पैसा
मुंबई इंडियन्स अर्जुन तेंडुलकरचा ब्रेकअप, आता आयपीएलमध्ये या टीमकडून खेळणार
Google Maps मध्ये नवे फीचर, बॅटरी लवकर संपणार नाही, जाणून घ्या