कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी:
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाआघाडीचा महापराभव करून बिहारमध्ये नितेश कुमार हे आता मुख्यमंत्री म्हणून दहाव्यांदा शपथ घेतील.(?) हा त्यांचा एक व्यक्तिगत विक्रम म्हणावा लागेल. एन डी ए च्या बिहार मधील महा विजयाने अनेक गोष्टी आता स्पष्ट झाल्या आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील (Mahavijaya)केंद्रशासन अधिक बळकट झाले आहे, भाजप/जे डी यु चा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग यशस्वी झाला आहे, महिला मतदारांना थेट लाभार्थी बनवून त्यांच्या बँक खात्यावर सरकारी पैसा वळवला की त्याचे विजयाच्या गुलालात रूपांतर होते हे सिद्ध झाले,मत चोरी आणि सदस्य मतदार याद्या हे मुद्दे सर्वसामान्य जनतेने बे दखल केले, आणि महाआघाडीच्या “प्रत्येक घरात सरकारी नोकरी”या आश्वासनावर कुणीही विश्वास ठेवला नाही,राजकारणातील चाणक्य अशी देशभर ओळख निर्माण केलेल्या प्रशांत किशोर यांची चाणक्यगिरी चालली नाही, एका महा विजयातून या अशा अनेक गोष्टी अधोरेखित होऊन पुढे आलेल्या आहेत.

विसर्जित बिहार विधानसभेत एकूण 243 पैकी 130 आमदार एनडीए चे होते. त्यामध्ये भाजप 80, जे डी यु 45 व इतर पाच आणि आर जे डी 77, काँग्रेस 19, इतर 15 आणि तटस्थ दोन या संख्याबळाच्या तुलनेत सध्याचे म्हणजे शुक्रवारचे निकाल पाहिले की महाविजय आणि महापराभव म्हणजे नक्की काय हे लक्षातच येऊ शकेल. एनडीएने 200 च्या जागा जिंकलेल्या आहेत, आणि महाआघाडीला अर्धशतका च्या आतच म्हणजे चाळीशी ही गाठता आलेली नाही. जे डी यु चे नितेश कुमार हे बिहारमध्ये सलग वीस वर्षे सत्तेत आहेत आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही हे सुद्धा इथे लक्षात घेतलेपाहिजे.गेल्याकाहीमहिन्यांपासून काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मत चोरी आणि सदस्य मतदार याद्या या एकाच विषयावर देशभर चर्चा सुरू ठेवली होती.
लोकसभा निवडणुकीत त्यांनी संविधान बचाव हा मुद्दा लावून धरला होता आणि त्याचा त्यांना काँग्रेस खासदारांची संख्या 100 पर्यंत नेण्यासाठी फायदाही झाला होता. पण मतचोरीच्या मुद्द्याचा त्यांना अजिबात फायदा झालेला नाही उलट सर्व सामान्य मतदारांनी तिकडे दुर्लक्षच केले. लालूप्रसाद यादव यांच्या विरुद्धचे भ्रष्टाचाराचे गुन्हे सिद्ध झाले, त्यांना शिक्षा झाली (काँग्रेस राजवटीतच)आणि त्यांचेच पुत्र असलेल्या तेजस्वी यादवांच्या आर जे डी बरोबर त्यांना आघाडी करण्याची वेळ आली हे त्यांचे नवे काँग्रेसचे दुर्दैव म्हणावे लागेल. महाआघाडीच्या नेत्यांनी विकासाचे मुद्दे प्रभावीपणे मांडले नाहीत. घरटी सरकारी नोकरी हे आश्वासन मतदारांनाच अविश्वसनीय वाटले. परिणामी महाआघाडीचा सुपडासाफ झाला. विकास विरुद्ध जंगल राज या लढतीत पुन्हा एन डी ए मुसंडी मारली. विशेष म्हणजे राहुल गांधी यांचा हा अकरावा पराभव आहे. कर्नाटक सारखे काही त्याला अपवाद आहेत.
निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठीविकास प्रारूप दाखवावे लागते. रणनीती ठरवावी लागते, योग्यउमेदवारांची निवड करावी लागते, जागावाटप विना विलंब करावे लागते, दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील असा विश्वास सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण करावा लागतो. विकासाशी निगडित नसलेले मुद्दे मांडून काही उपयोग होत नसतो. विशेषतः सर्वसामान्य माणसाची जगण्याची लढाई सुसह्य करावी लागते. हे सर्व करण्यात महाआघाडी सपशेल अपयशी ठरली आणि परिणामी त्यांना महा पराभव पत्करावा लागला.विसर्जित विधानसभेत ज्यांची संख्या शंभरच्या पुढे होती, त्यांना आता अर्धशतकही गाठता आलेले नाही.लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत गेम चेंजर ठरली. त्यानंतर ही योजना महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत राबवली गेली आणि महायुतीला महाविजय मिळाला. हीच योजना बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळ्या प्रकारे राबवली गेली.
तिथे सुमारे दीड कोटी महिला मतदारांच्या बँक खात्यावर प्रत्येकी दहा हजार रुपये सरकारी तिजोरीतून वळवण्यात आले. त्याचा सर्वात मोठा फायदा एन डी ए ला मिळाला. सरकारी पैसा वापरून महिला मतदारांची मते विकत घेतली असे आता काँग्रेसचे काही नेते प्रतिक्रिया देताना बोलू लागले आहेत. पण याच काँग्रेसवाल्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते हे ते आता विसरलेले दिसतात. एनडीएच्या महाविजेयात बिहार मधील महिला मतदारांचा मोठा वाटा आहे हे मान्य करावेच लागेल.गेल्या काही वर्षांपासून प्रशांत किशोर हे राजकीय चाणक्य म्हणून ओळखले जात होते. अनेक राजकीय पक्ष त्यांचे मार्गदर्शन घेत होते.पण बिहारच्या सार्वत्रिकनिवडणुकीत प्रशांत किशोर यांनी स्वतःच जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून चाचणी केली तेव्हा त्यांच्या हाती भोपळा आला.
त्यांची चाणक्य नीति बिहारमध्ये चालली नाही.बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएला विशेषता भारतीय जनता पक्षाला जे अभूतपूर्व यश मिळालेले आहे त्याचे परिणाम महाराष्ट्रातील (Mahavijaya)स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर होतील काय अशी चर्चा सुरू झाली आहे.मुंबई महापालिका आणि मुंबई परिसरातील महापालिकांच्या निवडणुकीतभारतीय जनता पक्षाला अर्थात महायुतीला थोडाफार फायदा होईल. बिहारी मतेमहायुतीकडे वळतील. पण महायुतीला बिहारच्या निकालाचा निर्विवाद फायदा होईल असे म्हणता येणार नाही.मतचोरी आणि मतदार यादीतील घोळ हा मुद्दा महाराष्ट्रात महाविकास आघाडीने लावून धरलेला आहे. मतदार यादी मधील घोळ संपवा आणि मगच सानिका स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या अशी महाविकास आघाडीतील नेत्यांची मागणी आहे. मत चोरी आणि सदोष मतदार याद्या या मुद्द्यांचा बिहारमध्ये काडीमात्र फायदा झालेला नाही, हे महाराष्ट्रातील विरोधकांनी लक्षात घेतले पाहिजे.

हेही वाचा :
IPL 2026 च्या रिटेंशनच्या आधी CSK ला या खेळाडूने केला अलविदा
अभिनेता राजकुमार राव बनला पिता, मुलगा झाला की मुलगी ?
आज शनिवारच्या दिवशी या राशींवर होणार धनवर्षाव…