महाराष्ट्रात(Maharashtra) अखेर हिवाळ्याने दमदार हजेरी लावली असून, राज्यातील बहुतांश भागात तापमानात लक्षणीय घसरण नोंदवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांनी वातावरणात गारवा निर्माण केला आहे. पुणे , मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये पहाटेच्या वेळी गुलाबी थंडीने चांगलाच जोर पकडला आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील किमान तापमान 2 ते 8 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे.

पुढील तीन दिवसांमध्ये किमान तापमानात कोणताही मोठा बदल होणार नसल्याचे IMD ने स्पष्ट केले आहे. मात्र उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये तापमान आणखी 2 ते 3 अंश सेल्सिअसने खाली येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये किमान तापमान 10 ते 13 अंशांच्या दरम्यान राहणार असल्याने थंडीचा कडाका कायम राहणार आहे.
मुंबईतही (Maharashtra)थंडीची चाहूल चांगलीच जाणवत आहे. पहाटेच्या वेळेत प्रवास करणाऱ्या नागरिकांना थंडगार वार्यामुळे हुडहुडी भरत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर व रायगडमध्ये सकाळी लवकर तापमान काहीसे खाली येत असून शहरात हलका दवही पडत आहे. हिवाळ्याच्या त्या जुन्या अनुभूतीला पुन्हा सुरुवात झाल्याचे नागरिक सांगत आहेत.
पुण्यामध्ये थंडीचा कडाका आणखी तीव्र आहे. शहरातील अनेक परिसरांमध्ये पहाटेच्यावेळी शेकोट्या पेटवण्याची चित्रे पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांत पुण्यात तापमानात सतत घसरण होत असून सकाळ-संध्याकाळ जवळपास सर्वत्र गारवा जाणवत आहे. वातावरणातील आर्द्रता कमी झाल्याने थंडी अधिक चटका लावत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
हवामान विभागाने जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार यांसारख्या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी तापमान आणखी खाली येण्याचा इशारा दिला आहे. पुढील काही दिवसांत या भागांमध्ये 10 ते 13 अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी थंडीपासून योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यासोबतच पुढील पाच दिवसांत कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नसल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. दिवसाच्या वेळेत उन्हाची तीव्रता थोडीशी कमी असून, रात्री गारठा अधिक जाणवत आहे. विशेषत: मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये किमान तापमान ‘सामान्यपेक्षा कमी’ नोंदवले गेले आहे.

हेही वाचा :
सुनील शेट्टीचा लेक या मराठी अभिनेत्रीला करतोय डेट
तिसरीतील विद्यार्थ्याकडून घृणास्पद प्रकार, S*X व्हिडिओ पाहून मित्रालाच….
हिवाळ्यात बऱ्याच दिवस पालेभाज्या राहतील फ्रेश, फॉलो करा या खास टिप्स