आयपीएल 2026 सीजनच्या आधीच मोठमोठ्या फ्रेंचायजींमध्ये झालेल्या trades मुळे क्रिकेट जगतात प्रचंड खळबळ माजली आहे. चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्सने तब्बल दोन स्टार खेळाडूंची(team) अदलाबदल करत मोठी डील पूर्ण केली आहे. वर्षानुवर्षे CSK चा कणा मानला जाणारा ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा आता राजस्थान रॉयल्सकडून खेळणार असून त्याची किंमत ₹14 कोटी असेल. तर दुसऱ्या बाजूला राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसन चेन्नईमध्ये सामील होत असून पुढील सीजनपासून तो CSK च्या जर्सीत 18 कोटींच्या करारावर मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली चर्चेची मालिका शेवटी या मोठ्या डीलमध्ये परिवर्तित झाली.

IPL 2026 साठी आज खेळाडू रिटेन्शनची शेवटची तारीख होती आणि याच ट्रेड विंडोमध्ये अनेक स्टार खेळाडूंनी टीम बदलत नवी दिशा घेतली. जाडेजा आणि सॅमसन व्यतिरिक्तही सॅम करन, मोहम्मद शमी, मयंक मार्कंडेय, अर्जुन तेंडुलकर, नितीश राणा आणि डोनोवन फरेरा या खेळाडूंनी नवीन फ्रेंचायजींची निवड केली.CSK चा माजी कॅप्टन जाडेजा 12 सीजनच्या नात्यानंतर प्रथमच नवीन घर शोधत आहे. त्याचे शुल्क 18 कोटींवरून 14 कोटींवर आले असले तरी राजस्थानसाठी तो मोठा ऑलराऊंडिंग अॅसेट ठरणार आहे. त्याचवेळी सॅमसनच्या आगमनाने CSK चा बॅटिंग लाइनअप आणखी मजबूत होईल, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.
इंग्लंडचा ऑलराऊंडर सॅम करन देखील CSK मधून राजस्थानमध्ये गेला असून 2.4 कोटींच्या फीवर तो आता आयपीएलमधील तिसऱ्या फ्रेंचायजीसाठी खेळेल. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सनरायजर्स हैदराबादमधून लखनौ सुपर जायंट्समध्ये 10 कोटींच्या करारावर दाखल झाला आहे. 2023 चा पर्पल कॅप(team) विजेता असलेला शमी LSG च्या बॉलिंग लाइन-अपला मोठी धार देणार आहे.मयंक मार्कंडेय कोलकात्यातून पुन्हा मुंबई इंडियन्सकडे 30 लाखांच्या करारावर परतला. अर्जुन तेंडुलकर यालाही MI ने ट्रेड करत LSG च्या ताब्यात दिले आहे. त्याची फी अपरिवर्तित 30 लाख राहील. अनुभवी नितीश राणा राजस्थानमधून दिल्ली कॅपिटल्सकडे 4.2 कोटींच्या करारावर गेला असून 2023 मध्ये KKR कॅप्टन असलेला हा डावखुरा फलंदाज नवी जबाबदारी पेलण्यासाठी सज्ज आहे.
दक्षिण आफ्रिकेचा ऑलराऊंडर डोनोवन फरेरा दिल्लीमधून राजस्थानकडे ट्रेड झाला असून त्याची फी वाढून आता ₹1 कोटी झाली आहे.या सर्व बदलांमुळे IPL 2026 सीजन आधीच अत्यंत रोमांचक ठरण्याचे संकेत मिळत असून पुढील वर्षीच्या लिलावात आणि मैदानावर दोन्ही ठिकाणी प्रचंड उत्सुकता पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :
Google Maps मध्ये नवे फीचर, बॅटरी लवकर संपणार नाही, जाणून घ्या
महाविजय / महा पराभव अर्थ आणि अन्वयार्थ…!
IPL 2026 च्या रिटेंशनच्या आधी CSK ला या खेळाडूने केला अलविदा