गुगल मॅप्स(Google Maps) आपल्या वापरकर्त्यांसाठी नवे आणि उपयुक्त फीचर घेऊन आले आहे. कंपनीने नुकताच पॉवर सेव्हिंग मोड अधिकृतपणे लाँच केला असून, या फीचरमुळे नेव्हिगेशनदरम्यान फोनची बॅटरी अधिक काळ टिकणार आहे. खास करून ज्यांना लांब अंतराचा प्रवास करावा लागतो किंवा दिवसभर नेव्हिगेशनचा वापर करावा लागतो, त्यांच्यासाठी हा अपडेट अतिशय फायदेशीर ठरणार आहे.

गुगलच्या माहितीनुसार, पॉवर सेव्हिंग मोड सक्रिय केल्यानंतर स्क्रीनवर लो-पॉवर मॅप दिसेल. या नकाश्यात केवळ पुढील वळणाची दिशा आणि गंतव्यस्थानावर पोहोचण्याची अंदाजे वेळ एवढीच माहिती दाखवली जाईल. नकाशावरील इतर लेबल, बटणे आणि अतिरिक्त माहिती स्वयंचलितपणे काढून टाकली जाईल, ज्यामुळे बॅटरीचा वापर लक्षणीय कमी होईल. विशेष म्हणजे हा नकाशा लॉक स्क्रीनवरही दिसणार असल्याने वारंवार फोन अनलॉक करण्याची गरज भासणार नाही.
हे फीचर डीफॉल्टनुसार बंद असेल. वापरकर्त्यांनी ते सुरू करण्यासाठी फोनचे पॉवर बटण एकदा दाबायचे. पुन्हा पॉवर बटण दाबल्यास किंवा स्क्रीनवर टॅप केल्यास फीचर बंद होईल. यामुळे(Google Maps) हा मोड वापरणे अत्यंत सोपे झाले आहे.गुगल मॅप्सचा पॉवर सेव्हिंग मोड सर्वात आधी Google Pixel 10 सीरिज मध्ये उपलब्ध झाला आहे. यात Pixel 10, Pixel 10 Pro, Pixel 10 Pro XL आणि Pixel 10 Pro Fold या मॉडेल्सचा समावेश आहे. गेल्या महिन्यात काही बीटा युजर्ससाठी या फीचरची चाचणी करण्यात आली होती, आणि आता ते अधिकृतपणे सर्व Pixel युजर्ससाठी उपलब्ध होत आहे.
या अपडेटमुळे गुगल मॅप्सचा अनुभव अधिक वेगवान, हलका आणि बॅटरी-फ्रेंडली होणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

हेही वाचा :
महाविजय / महा पराभव अर्थ आणि अन्वयार्थ…!
IPL 2026 च्या रिटेंशनच्या आधी CSK ला या खेळाडूने केला अलविदा
अभिनेता राजकुमार राव बनला पिता, मुलगा झाला की मुलगी ?