आयपीएल 2026 पूर्वी चेन्नई सुपरकिंग्सने त्यांचा माजी कर्णधार आणि ऑलराऊंडर क्रिकेटर(players) रवींद्र जडेजाला बाहेर केलं आहे. तब्बल 12 वर्ष जडेजा सीएसकेचा भाग होता मात्र आगामी सीजनपूर्वी त्याला राजस्थान रॉयल्स सोबत ट्रेड करण्यात आलं आहे. त्यामुळे आता आयपीएल 2026 मध्ये जडेजा हा राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधित्व करताना दिसेल. आयपीएल 2025 मध्ये जडेजाचा पगार हा 18 कोटी होता तर आयपीएल 2026 मध्ये राजस्थानकडून त्याला 14 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आणि स्टार विकेटकिपर फलंदाज संजू सॅमसन याला आयपीएल 2026 पूर्वी राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपरकिंग्स सोबत ट्रेड केलं आहे. त्यामुळे सॅमसन हा पुढील सीजन सीएसकेच्या पिवळ्या जर्सीत खेळताना दिसेल. संजू सॅमसनने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 177 सामने खेळले आहेत. 2013 मध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. संजू सॅमसनला 18 कोटींनाच विकेट घेण्यात आलं आहे.

अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीला (players)सनरायजर्स हैदराबादने लखनऊ सुपर जाएंट्स सोबत ट्रेड केलं आहे. मोहम्मद शमीला मागच्या सीजनसाठी 10 कोटींना करारबद्ध करण्यात आले होते, यंदाही याच किंमतीवर त्याला लखनऊ सोबत ट्रेड करण्यात आलं आहे. हैदराबादपूर्वी शमी हा गुजरात टायटन्सचा भाग होता. गोलंदाज मयंक मार्कं याला कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्स सोबत ट्रेड केलं आहे. केकेआरने मागच्यावर्षी त्याला 30 लाखांमध्ये आपल्या संघाशी जोडलं होतं, यंदाही मुंबईने तेवढ्याच किंमतीत त्याला आपल्या संघात सामील करून घेतलं आहे.

मुंबई इंडियन्सने बॉलिंग ऑलराउंडर असलेल्या अर्जुन तेंडुलकरला आयपीएल 2026 पूर्वी लखनऊ सुपर जाएंट्स सोबत ट्रेड केलं आहे. अर्जुनला 30 लाखांमध्येच लखनऊमध्ये सामील करण्यात आले. 2021 ऑक्शनमध्ये अर्जुन मुंबईचा भाग होता, 2023 मध्ये त्याला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. पण मागच्या वर्षी त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. फलंदाज नितीश राणा हा राजस्थान रॉयल्सचा भाग होता मात्र आयपीएल 2026 पूर्वी त्याला दिल्ली कॅपिटल्समध्ये ट्रेड करण्यात आलं आहे. मागच्यावर्षी त्याला 4.2 कोटींना करारबद्ध करण्यात आलं होतं, यंदाही त्याचा याच किंमतीत दिल्लीने सामील करून घेतलं आहे.

ऑलराउंडर डोनोवन फरेराला दिल्ली कॅपटल्सने राजस्थान रॉयल्स सोबत ट्रेड केलं आहे. ट्रांसफर एग्रीमेंटनुसार डोनोवन फरेराची किंमत ही मागच्यावर्षी 75 लाख रुपये होती, मात्र राजस्थानने त्याला 1 कोटीला विकत घेतलं आहे. चेन्नई सुपरकिंग्सचा ऑलराऊंडर खेळाडू(players) सॅम करनला राजस्थान रॉयल्स सोबत ट्रेड करण्यात आलं आहे. 2.4 कोटींनाच त्याला राजस्थान रॉयल्सने आपल्या संघात घेतलं आहे.

हेही वाचा :

होय, मी कट्टर भाजप समर्थक… अभिनेत्री निवेदिता सराफ बेधडक बोलल्या…

कोल्हापूरमध्ये गर्भवती महिला बांधावरून पाय घसरून पडली अन् रुग्णालयात नेताच मृत्यू

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, निवडणुकीआधीच काँग्रेसने घेतला मोठा निर्णय

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *