बिहार विधानसभा निवडणुकीत (elections)मोठ्या विजयाची नोंद झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार येत्या 19 नोव्हेंबरला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे. 24 फेब्रुवारी 2019 पासून सुरू असलेल्या या योजनेअंतर्गत वर्षाला 6,000 रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना दिली जाते आणि आतापर्यंत 11 कोटींपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना तब्बल 3.70 लाख कोटी रुपये दिले गेले आहेत.

केंद्रीय कृषी मंत्र्यांनी शुक्रवारी याची अधिकृत माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार पीएम-किसान योजनेच्या 20 हप्त्यांचे यशस्वी वितरण झाल्यानंतर आता 21 वा हप्ता राष्ट्रपती बालदिनाच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. कृषी उत्पादन, बियाणे, शिक्षण, आरोग्य आणि शेतीच्या दैनंदिन खर्चासाठी ही मदत मोठ्या प्रमाणात उपयोगी ठरते. विशेष म्हणजे अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यासाठी केंद्र सतत पडताळणी करत आहे, ज्यामुळे निधी फक्त योग्य शेतकऱ्यांपर्यंतच पोहोचतो.

दरम्यान, अतिवृष्टी आणि पुरामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यापूर्वी 26 सप्टेंबर रोजी केंद्राने पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील पुरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 21 वा हप्ता आगाऊ देत 540 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा केली होती.

PM-Kisan योजनेचा फायदा पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. ज्यांचे नाव लाभार्थी यादीत नसेल त्यांना रक्कम मिळणार नाही. शेतकऱ्यांनी स्वतःचा नावाचा तपशील आणि पेमेंट स्टेटस घरबसल्या (elections)तपासण्यासाठी pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘शेतकरी कॉर्नर’मध्ये ‘लाभार्थी यादी’ हा पर्याय निवडावा. नंतर आधार क्रमांक किंवा खाते क्रमांक टाकून ‘Get Data’ वर क्लिक केल्यानंतर रकमेची स्थिती सहज पाहता येईल.

हेही वाचा :

मुंबई इंडियन्स अर्जुन तेंडुलकरचा ब्रेकअप, आता आयपीएलमध्ये या टीमकडून खेळणार

Google Maps मध्ये नवे फीचर, बॅटरी लवकर संपणार नाही, जाणून घ्या

महाविजय / महा पराभव अर्थ आणि अन्वयार्थ…!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *