राज्यातल्या राजकारणातली मोठी बातमी समोर येतेय. मुंबईत काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलाय. मुंबई महानगर पालिकेची निवडणूक काँग्रेस(Congress) स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केलीये. मुंबईत महाविकास आघाडीची शक्लं झाल्याचं ते यावेळी म्हणाले. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

यावेळी रमेश चेन्नीथला यांनी बिहार निवडणुकीवरही भाष्य केले. हा निवडणूक आयोगाचा विजय आहे. भाजपाचा नाही. निवडणूक भाजपा जिंकल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेसमध्ये(Congress) प्रत्येक जातीचे लोक आहेत. त्यांच्या पार्टीत फक्त एका जातीचे लोक आहेत, ही आमची परंपरा आहे. मोदी आणि शाह यांनी निवडणूक आयोगाचा दुरुपयोग केला आहे. लोकांमध्ये जाऊन त्याबद्दल जागृती करणार असल्याचे ते म्हणाले.पंतप्रधान मोदी हे काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका करत असतात, असेही ते म्हणाले.
कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, मुंबई कॉंग्रेसचे प्रभारी यू.बी. वेंकटेश यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई काँग्रेसतर्फे एक दिवसीय शिबिर मालाड येथे पार पडले. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,मुंबई अध्यक्ष उपस्थित होते. बीएमसी निवडणूक निर्णय प्रदेश काँग्रेस कमिटीवर सोडल्याचे यावेळी काँग्रेस प्रभारींनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष पदाधिका-यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतातय. अनेक ठिकाणी पक्षप्रवेश सोहळे पार पडत आहेत. अशात काँग्रेसमध्ये कुठेही बंडोखोरी होणार नाही, असा विश्वास काँग्रेस नेते नाना पटोलेंनी व्यक्त केलाय. तसंच त्याऐवजी भाजपमध्येच बंडखोरी पाहायला मिळत असल्याचा दावा पटोलेंनी केलाय.
बदलापूर काँग्रेसचे शहराअध्यक्ष संजय जाधवांनी पदाचा आणि काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष दयानंद चोरघेंनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिलीये. त्यातूनच संजय जाधवांनी पदाचा राजीनामा दिल्याचं बोललं जातंय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुरु झालेल्या या राजीनामा सत्रामुळे काँग्रेसला निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :
10 लाखापेक्षा कमी किंमतीत जबरदस्त मायलेज देतात ‘या’ कार
काकांचं प्रेम लय जबरी थेट किंग कोब्रालाच जाऊन केली Kiss, लोक म्हणाली “अहो, यमराजांना तरी घाबरा”; Video Viral
“माझे अश्लील फोटो पाहून माझा मुलगा…”, गिरिजा ओक ‘त्या’ फोटोंवरून संतापली