बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या विक्रमी यशानंतर राज्यभरात जल्लोषाचं वातावरण आहे. निकाल जाहीर होताच भाजपने 95 जागांवर आघाडी घेत सर्वात मोठा पक्ष ठरला, तर जेडीयूने 82 जागांवर विजय मिळवत दुसरा क्रमांक पटकावला. एनडीएच्या या भक्कम कामगिरीने(Actress) पक्षातील कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये उत्साहाची लाट उसळली आहे.

अशातच अभिनेत्री(Actress) निवेदिता सराफ यांनीही भाजपच्या विजयाबद्दल प्रतिक्रिया देत स्वतःला कट्टर बीजेपी समर्थक असल्याचं सांगितलं. विजयाच्या निमित्ताने झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी “मी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच आनंद होत आहे,” असं म्हणत पक्षाचं खुलेआम समर्थन व्यक्त केलं आहे.
याआधी दिवाळी पहाट कार्यक्रमात दिग्दर्शक महेश कोठारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचं जोरदार कौतुक करत मुंबई महापालिकेत कमळ फुलण्याचा विश्वास व्यक्त केला होता. त्यांच्या या विधानावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका करत “कलाकार म्हणून तुमचे सिनेमे सर्वांनी पाहिले आहेत, फक्त भाजपवाल्यांनी नाही,” अशी प्रतिक्रिया दिली होती. आता निवेदिता सराफ यांच्या वक्तव्यामुळेही राजकीय आणि कलाविश्वात नवा चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.

हेही वाचा :
कोल्हापूरमध्ये गर्भवती महिला बांधावरून पाय घसरून पडली अन् रुग्णालयात नेताच मृत्यू
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, निवडणुकीआधीच काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
10 लाखापेक्षा कमी किंमतीत जबरदस्त मायलेज देतात ‘या’ कार