बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने जबरदस्त विजय मिळवला असून, भाजपाच्या कामगिरीला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या विजयाच्या लाटेत सीतामढी मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार(candidate) सुनील कुमार पिंटू हेही विजयाच्या रांगेत आहेत. मतदारसंघातून 1,04,226 मते मिळवून त्यांनी आरजेडीच्या सुनील कुमार कुशवाह यांच्यावर 5,983 मतांनी मात केली.

या निवडणुकीपूर्वी सुनील कुमार पिंटू (candidate)यांचा कथित अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामुळे बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. तथापि, पिंटू यांनी या व्हिडीओबाबत तक्रार करत म्हटले की व्हिडीओ खोटा आणि मॉर्फ केलेला आहे, तसेच हा विरोधकांचा कट आहे, ज्याद्वारे त्यांच्या प्रतीमा आणि राजकीय प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला.
त्यांच्या या तक्रारीनंतरही, मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवून विजयाची झेंडा फडकवली. सुनील कुमार पिंटू यांची ही विजयाची कामगिरी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील आणखी एक महत्वाचा टप्पा ठरली आहे. याआधीही 2010 मध्ये त्यांनी विजय मिळवला होता, तर 2015 मध्ये आरजेडीच्या उमेदवाराकडून पराभूत झाले होते. या विजयासोबतच, त्यांनी स्पष्ट केले की राजकीय आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करून ते पुढे जाण्यासाठी कटिबद्ध आहेत.

हेही वाचा :
Kawasaki ने भारतात लाँच केली 1,099 cc इंजिनच्या 2 बाईक, किंमत 12 लाखांपेक्षाही जास्त
IPL 2026 पूर्वी ‘या’ 8 खेळाडूंना मिळाली नवी टीम…
भारतासाठी मोठी गुडन्यूज! डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय