आशिया कप 2025 पुरुष स्पर्धेत टीम इंडियाने तब्बल तीन वेळा पाकिस्तान संघाचा दारुण पराभव केला. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सामना संपल्यावर खेळाडूंनी(players) एकमेकांशी हात मिळवला नाही. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि त्याच्या संघाने घेतलेली ही भूमिका पाकिस्तानला खूप झोंबली. पण अनेक भारतीय यावेळी टीम इंडियाच्या पाठीशी उभे राहिले. आशिया कप 2025 मध्ये सुरु झालेल्या या हॅन्डशेक वादात आता नवा ट्विस्ट आलाय. रविवारी 16 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला गेला. मात्र या सामन्यात जे घडलं ते पाहून सर्वच हैराण झाले.

श्रीलंकेत दृष्टीहीन महिलांच्या टी20 स्पर्धेत रविवारी भारताचा सामना पाकिस्तानशी होता. भारतीय पुरुष संघाप्रमाणेच भारताचा महिला संघ सुद्धा पाकिस्तानच्या खेळाडूंशी(players) हात मिळवणार नाही. टॉस दरम्यान भारताच्या कर्णधाराने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला नाही. पण सामना संपल्यावर दोन्ही संघाच्या खेळाडूंनी एकमेकांशी हात मिळवला. जे पाहून सर्वच हैराण झाले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार भारत-पाकिस्तान ब्लाइंड महिला संघातील सर्व खेळाडू या सामन्यापूर्वी एकाच बसमध्ये बसून स्टेडियमसाठी रवाना झाले. सामन्यानंतर जेव्हा दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकमेकांशी हात मिळवला तेव्हा फॅन्स आश्चर्यचकित झाले. सध्या या घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यावर लोकांनी वेगवेगळ्या रिऍक्शन दिल्या. काहींनी याला ‘स्पिरिट ऑफ द गेम’ असं म्हटलं, तर काहींनी प्रश्न उपस्थित केले. बीसीसीआयने याबाबत अद्याप कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.
हॅन्डशेक वाद बाजूला ठेवला, तर भारताच्या अंध महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानच्या संघावर 8 विकेटने विजय मिळवला. कटुनायके येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात, पाकिस्तानच्या अंध महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना स्कोअरबोर्डवर 135 धावा केल्या. टीम इंडियाने हे लक्ष्य फक्त 10.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं आणि फक्त दोन विकेट गमावल्या.

हेही वाचा :
राज ठाकरेंच्या एका आदेशामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
एस्कलेटवरुन सायकल चालवायला गेला अन्…; असं काही घडलं की पुन्हा करणार नाही धाडस, Video Viral
प्राची केंगार हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड