आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी संघांनी तयारीला वेग दिला आहे. मागील हंगामातील चुका दुरुस्त करत संघ अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या पार्श्वभूमीवर चेन्नई सुपर किंग्सने मोठा निर्णय घेतला असून रिटेन्शन आणि रिलीज यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, काही अनुभवी आणि चर्चेत असलेल्या खेळाडूंना (players)CSK ने या यादीतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.याच दरम्यान ट्रेड विंडोमध्येही CSK अत्यंत सक्रिय दिसली. संजू सॅमसनला संघात घेण्यासाठी रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांना राजस्थान रॉयल्सकडे ट्रेड करण्यात आले. या चर्चित डीलनंतर आता संघाने 9 खेळाडूंना रिलीज करत मोठे पाऊल उचलले आहे. फ्रँचायझींना या वर्षी मिनी लिलाव असल्याने जास्तीत जास्त खेळाडू रिटेन करण्याची मुभा होती, तरीही CSK ने मोठी स्वच्छता मोहीम राबवली आहे.

चेन्नई सुपर किंग्सने राहुल त्रिपाठी, वंश बेदी, सी. आंद्रे सिद्धार्थ, दीपक हुड्डा, रचिन रविंद्र, विजय शंकर, शेख रसीद, कमलेश नागरकोटी आणि मथीशा पथिराना या नऊ खेळाडूंना (players)रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, मथीशा पथिरानासारख्या महत्त्वाच्या वेगवान गोलंदाजाला रिलीज केल्याने अनेकांना धक्का बसला आहे.या खेळाडूंवर CSK ने मागील हंगामात मोठी रक्कम खर्च केली होती. राहुल त्रिपाठीसाठी 3.40 कोटी, दीपक हुड्डासाठी 1.70 कोटी, रचिन रविंद्रासाठी 4 कोटी, विजय शंकरसाठी 1.20 कोटी, तर पथिरानासाठी तब्बल 13 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. आता ही सर्व रक्कम मिनी लिलावात पुन्हा वापरता मिळणार आहे. त्यामुळे CSK कोणत्या नवीन खेळाडूंवर डाव लावणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
रिटेन्शन यादीत काही अनुभवी खेळाडूंबरोबरच काही तरुण नवोदितांची निवड करण्यात आली आहे. संघाने ऋतुराज गायकवाड यांच्यावर कर्णधार म्हणून विश्वास कायम ठेवला आहे. त्याचबरोबर एमएस धोनीही संघात कायम असून ते संघासाठी मेंटॉरची भूमिका बजावू शकतात, अशी चर्चाही रंगली आहे.याशिवाय डेवाल्ड ब्रेविस, उर्विल पटेल, डेवोन कॉन्वे, शिवम दुबे, जेमी ओव्हर्टन, श्रेयस गोपाल, खलील अहमद, नुर अहमद, नाथन एलिस, मुकेश चौधरी, अंशुल कम्बोज, गुरजपनीत सिंह, रामकृष्ण घोष यांनाही रिटेन करण्यात आले आहे. या खेळाडूंच्या भोवती CSK आपली पुढील टीम स्ट्रॅटेजी तयार करणार असल्याचे संकेत आहेत.
आता CSK मिनी लिलावात कोणत्या खेळाडूंवर बोली लावणार, कोणत्या स्थानांना प्राधान्य देणार आणि संघाची नवी रचना कशी असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रचिन रवींद्र व पथिरानासारखे खेळाडू मुक्त झाल्याने इतर फ्रँचायझ्याही त्यांच्यासाठी आक्रमक बोली लावण्याची शक्यता आहे. आयपीएल 2026 चा लिलाव यामुळे अधिक रोमांचक ठरणार आहे.

हेही वाचा :
महापालिका निवडणुका मार्चनंतर?
इचलकरंजी मनपासाठी पुन्हा प्रभाग आरक्षण सोडत…
भाजप उमेदवाराचा कथित अश्लील व्हिडीओ व्हायरल, पण…