उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यात पती-पत्नीच्या (Wife)नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेनं आरोप केला आहे की, जुगारात हरल्यामुळे तिच्या पतीने तिला स्वतःच्या मित्रांच्या हवेत सोडले आणि त्या आठ जणांनी आळीपाळीनं तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणानंतर पीडित महिला बिनोली पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. महिला ८ आरोपींपैकी ३ जणांना ओळखते, ज्यांच्याबाबत माहिती मिळाली आहे की ते गाझियाबादचे रहिवासी आहेत.

पीडितेचा विवाह २४ ऑक्टोबर २०२४ रोजी मेरठमधील खिवई गावातील दानिश नावाच्या तरुणाशी झाला होता. लग्नाच्या सुरुवातीपासूनच नवऱ्याच्या मद्यपान आणि जुगार खेळण्याची समस्या असल्याचे पीडितेने सांगितले. हुंडा मिळत नसल्यामुळे नवरा व सासर मंडळींकडून सतत छळ केला जात होता. एका दिवशी जुगारात नवऱ्याने हार मानली आणि उपस्थित मित्रांना पत्नीसोबत(Wife) बलात्कार करण्याची परवानगी दिली. पीडितेने तिच्या सासरच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.

तिच्या गर्भवती अवस्थेतही सासरच्यांनी तिला गर्भपात करण्यास सांगितले, तसेच तिच्या पायांवर अॅसिड ओतल्याचा आरोपही केला. पीडितेने हा त्रास सहन न करता माहेरच्या कुटुंबाला प्रकरणाची माहिती दिली आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली. बिनोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील तपास सुरू असून, पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

या घटनेने परिसरात मोठा संताप निर्माण झाला असून, पोलिसांकडून तत्काळ कारवाई आणि आरोपींची अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा :

राज ठाकरेंच्या एका आदेशामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

एस्कलेटवरुन सायकल चालवायला गेला अन्…; असं काही घडलं की पुन्हा करणार नाही धाडस, Video Viral

प्राची केंगार हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *