अंबरनाथ नगर परिषदेसाठी भाजपकडून शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिल्याची चर्चा रंगली होती. अडीच-अडीच वर्ष नगराध्यक्षपदासाठी भाजपनं प्रस्ताव ठेवल्याची माहिती (politics)सूत्रांनी दिली. मात्र शिवसेनेकडून साडेतीन वर्षाची मागणी करण्यात आलीये. यासंदर्भात चर्चा सुरु असून लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे असंही सूत्रांनी म्हटंलय. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक मोठा आणि अनपेक्षित निर्णय घेतला आहे. राज ठाकरेंच्या एका आदेशामुळे अंबरनाथच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

2 डिसेंबर रोजी अंबरनाथ नगर परिषदेसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे महायुतीमधील दोन्ही पक्षांन कंबर कसली आहे. मात्र इथं शिवसेनेची ताकद जास्त आहे. त्यामुळे भाजपनं युतीचा प्रस्ताव दिल्याची चर्चा रंगली. अशातच राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे अंबरनची राजकीय गणिते बदलणार आहेत. राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशामुळे अंबरनाथमधील मनसे कार्यकर्ते गोंधले आहेत.
मनसे थेट ‘शिवतीर्था’वरून एक आदेश जारी केला आहे. मनसेने अंबरनाथची निवडणूक अधिकृतपणे लढवू नये, असा आदेश देण्यात आला आहे. या निर्देशामुळे अंबरनाथमधील मनसैनिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून स्पष्ट करण्यात आले की, मनसेची अधिकृत उमेदवारी कोणालाही दिली जाणार नाही. इच्छुकांनी अपक्ष म्हणून लढायचे किंवा आपापल्या राजकीय गणितांनुसार निर्णय घ्यायचा, अशी मुभा देण्यात आली आहे.
राज ठाकरे यांनी अचानक हा निर्णय जाहीर केल्याने स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात आले आहेत. मागील काही आठवड्यांपासून प्रचाराची जोरदार तयारी सुरु(politics) आहे. अशातच आता राज ठाकरे यांच्या आदेशामुळे आता ‘नेमके लढायचे कुठून? कोणाच्या पाठिंब्यावर? कोणत्या गटाशी किंवा आघाडीसोबत समन्वय करायचा?’ असे अनेक प्रश्न मनसैनिकांसमोर उभे राहिले आहेत.
संभाव्य उमेदवार कोणत्या चिन्हावर लढणार, स्थानिक पातळीवर त्यांना कोणती गटबांधणी मिळणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे मनसैनिकांमध्ये प्रचंड गोंधल निर्माण झाला आहे. अनेकजण पर्याय शोधत आहेत. मनसेने घेतलेल्या निर्णयामुळे अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीत स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मनसेच्या अधिकृत अनुपस्थितीमुळे प्रतिस्पर्धी पक्षांचे गणित बदलू शकते, तसेच मतांचे विभाजनाचा फायदा नेमका कोणाला होणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
प्राची केंगार हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
स्वच्छता कर्मचारीसमोर तरुणाचं ‘ते’ अश्लील कृत्य; संतापून महिलेनं झाडूनं धु, धु, धुतलं, Video Viral
…तर लाडकी बहीण योजेनेचे पैसे मिळणे बंद होणार; राज्य सरकारचा इशारा