समाजप्रभोधनकार आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा (engagement)संगमनेरमध्ये मोठ्या थाटात पार पडला. ज्ञानेश्वरी देशमुख आणि बांधकाम व्यावसायिक साहिल चिलाप यांच्या नुकत्याच झालेल्या साखरपुड्यावर प्रचंड पैशांची उधळपट्टी झाली असल्याचे काहीजणांकडून आरोप केले जात आहेत. यावरून अनेकांनी महाराजांवर टीका केली, मात्र इंदुरीकर महाराज यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. किर्तनात त्यांनी म्हटले की, “माझ्यावर टीका करायची ती करा, पण माझ्या कुटुंबापर्यंत जाण्याचं काम नव्हतं. काही जणांनी मुलीच्या कपड्यांवरून टीका केली, पण साखरपुड्यात कोणते कपडे घ्यायचे, हे मुलाकडचे की मुलीकडचे?” त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत किर्तन सोडण्याचीही शक्यता व्यक्त केली होती.

त्यांनी एका किर्तनात टिकाकारांना चांगलंच सुनावलं आणि म्हटले की, “आता माझ्या मुलीचं लग्न साखरपुड्यापेक्षाही अधिक थाटात पार पडणार आहे.” या पार्श्वभूमीवर महाराजांनी(engagement) पुन्हा एकदा आपल्या संतापाचीही जाणीव व्यक्त केली. मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी इंदुरीकर महाराजांवर टीका केली होती, “दुसऱ्याला साधेपणाने लग्न करण्याचा उपदेश देता, तर स्वतःच्या मुलीच्या लग्नाबद्दल बोलता, मग टीका होणारच,” असे त्यांनी म्हटले.
त्यावर प्रतिसाद देताना इंदुरीकर महाराज म्हणाले की, “जर कोणी कष्टाचा पैसा मुलीच्या लग्नात खर्च केला, तर लोकांना पोटदुखी का होईल? नेत्यांच्या सभा होतात, तीस मिनिटांच्या सभेवर कोटींचा खर्च होतो, ते मिडियावाले का दाखवत नाहीत? माझं त्यांना चॅलेंज आहे — त्यांनी तेही दाखवावं.”या घटनेनंतर महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्यावर खर्चाबाबत समाजामध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही जण महाराजांचे समर्थन करत आहेत, तर काही जण त्यांच्यावर टीका करत आहेत.

हेही वाचा :
“काँग्रेस लवकरच फुटेल…”, बिहार निकालानंतर पंतप्रधानांच्या भविष्यवाणीवर शरद पवारांचे मोठे विधान
ट्रेन येताच रेल्वे ट्रॅकवर झोपला पठ्ठ्या; अंगवारुन गाडी गेली अन्…, Video Viral
पैसे नसल्यानं पत्नीला ८ जणांच्या तावडीत दिलं,अन्….