जेवणाच्या ताटात भात हा पदार्थ कायमच असतो. भात खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखे वाटत नाही. पुलावभात, बिर्याणी, वरण भात, फोडणीचा भात इत्यादी अनेक वेगवेगळे पदार्थ भातापासून बनवले जातात. पण काहीवेळा दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवलेला भात शिल्लक राहतो(uttapa). मग उरलेल्या भाताचे नेमकं काय करावं? असे अनेक प्रश्न महिलांना कायमच पडतात. शिल्लक राहिलेल्या भातापासून फोडणीचा भात किंवा मसाले भात बनवला जातो. पण नेहमीच फोडणी भात खाऊन कंटाळा येतो. याशिवाय फोडणीच्या भातामुळे शरीरात ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते. शरीरात वाढलेल्या ऍसिडिटीमुळे आरोग्य बिघडून जाते.

म्हणूनच आज आम्ही तुम्हाला उरलेल्या भातापासून मऊ- जाळीदार उत्तपा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. उत्तपा हा पदार्थ तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा सांबारसोबत (uttapa)सुद्धा खाऊ शकता. याशिवाय उत्तपा बनवण्यासाठी बाहेरून विकत पीठ आणले जाते. पण विकतच्या पिठाचे उत्तपा बनवण्यापेक्षा उरलेल्या भातापासून उत्तपा बनवावा. चला तर जाणून घेऊया उरलेल्या भातापासून उत्तपा बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य:
उरलेला भात
रवा
दही
मीठ
पाणी
बेकिंग सोडा
गाजर
कांदा
शिमला मिरची
झणझणीत पदार्थांची आवड आहे? मग घरी बनवा विदर्भ स्टाईल ‘पाटवडी रस्सा’; यापुढे चिकन रस्साही पडेल फिका
कृती:
जाळीदार उत्तपा बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात शिजवलेला भात घेऊन त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून पेस्ट तयार करा.पीठ तयार करताना त्यात भाताचे बारीक कण अजिबात ठेवू नये. पूर्णपणे मिश्रण बारीक वाटून घ्यावे.त्यानंतर त्यात दही घालून मिक्स करा. तयार केलेली पेस्ट मोठ्या वाटीमध्ये काढून त्यात चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.त्यानंतर त्यात रवा घाला. गुठळ्या न होऊ देता सर्व साहित्य व्हिस्कीच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या.

तयार केलेले बॅटर १५ ते २० मिनिटं झाकण ठेवून काहीवेळा बाजूला ठेवून द्या. त्यानंतर त्यात बेकिंग सोडा घालून पुन्हा एकदा फेटून घ्या.तवा गरम करून त्यावर तेल लावा. त्यानंतर तव्यावर गोलाकार डोसा घालून घ्या. त्यानंतर वरून कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची घालून हलकेसे दाबून घ्या.दोन्ही बाजूने उत्तपा भाजून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला उत्तपा. हा पदार्थ खोबऱ्याच्या चटणीसोबत अतिशय सुंदर लागतो.
हेही वाचा :
युवराज सिंह होणार हेड कोच! आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी मोठ्या घडामोडी
यूट्यूबचं ‘सुपर रिझोल्यूशन’ फिचर बाजारात…
इचलकरंजीत गॅस गिझरचा भीषण स्फोट…दाम्पत्य गंभीर जखमी
