हिवाळा(winter) ऋतू सुरु होताच शरीराला अधिक ऊर्जा आणि ऊबदारतेची गरज असते. या काळात योग्य आहार घेणे अत्यंत महत्वाचे आहे. हिवाळ्यात शरीराला ताकद देणारं आणि उर्जा वाढवणारं एक नैसर्गिक खाद्य म्हणजे गूळ आणि चणे. गूळ-चणे केवळ चवीसाठी नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतात.

तज्ज्ञांच्या मते, गूळ-चणे खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा जास्त काळ टिकते. हिवाळ्यात थकवा आणि आळस जाणवतो, त्यामुळे डाएटमध्ये यांचा समावेश केल्यास लाभ होतो. पचनप्रक्रियेसाठीही हे फायदेशीर असते; गुळामुळे पाचक एंजाइम्स सक्रीय होतात तर चण्यामध्ये असलेला फायबर पोटाचे आरोग्य सुधारतो आणि बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळते.
हाडांसाठीही गूळ-चणे उपयुक्त ठरतात. चण्यामध्ये फॉस्फरस आणि मॅग्नेशिअम तर गुळामध्ये कॅल्शिअम असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात आणि सांधेदुखी किंवा संधिवात यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. तसेच, गुळातील लोह (फेरस) आणि चण्यामधील प्रोटीन शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवतात. यामुळे सर्दी, खोकला यांसारख्या समस्या कमी होतात.
गूळ-चणे एकत्र खाल्ल्याने अॅनिमियाच्या समस्या दूर होतात आणि त्वचेला नैसर्गिक तेज येते. विशेषतः हिवाळ्यात कोरड्या त्वचेपासून सुटका मिळते. दिवसातून 25-30 ग्रॅम भाजलेले चणे आणि 15-20 ग्रॅम गूळ खाणे योग्य मानले जाते. मात्र, अतिप्रमाणात गूळ-चणे सेवन केल्यास पोटाचे त्रास, गॅस, पोट फुगणे किंवा वजन वाढण्यास कारण होऊ शकते. सकाळी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये मर्यादित स्वरूपात गूळ-चणे समाविष्ट करणे फायदेशीर ठरते.हिवाळ्यात गूळ-चणे खाण्याची सवय शरीराला ताकद, उर्जा आणि रोगप्रतिकारक (winter)शक्ती देण्यास मदत करते, तसेच त्वचेला नैसर्गिक तेजही प्राप्त होते.

हेही वाचा :
नितीश कुमारांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा…
इंदुरीकर महाराज पुन्हा तापले, मुलीचं लग्न तर थाटात करणारच, पण आता.., दिलं नवं चॅलेंज
“काँग्रेस लवकरच फुटेल…”, बिहार निकालानंतर पंतप्रधानांच्या भविष्यवाणीवर शरद पवारांचे मोठे विधान