हिवाळा सुरू होताच कॉफीचा(coffee) सुगंध घराघरांत दरवळू लागतो. थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकजण दिवसातून दोन-तीन वेळा कॉफीचा आनंद घेतात. कॉफी शरीराला उब देतेच, पण ऊर्जा वाढवण्यासही मदत करते. मात्र, कॉफीतील जास्त कॅफिन कधी कधी आरोग्यावर उलट परिणाम करू शकते, असा तज्ज्ञांचा इशारा आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मर्यादित प्रमाणात कॉफी पिणे फायदेशीर असले तरी अतिरेक टाळणं अत्यंत गरजेचं आहे. वारंवार कॉफी घेतल्यामुळे ऍसिडिटी, निद्रानाश किंवा हृदयाचे ठोके वाढणे अशा समस्या उद्भवू शकतात. पण यावर एक अगदी सोपा आणि घरगुती उपाय अनेकांना माहितच नाही.
कॉफीमध्ये हळद मिसळून प्या — आरोग्यासाठी सुपर कॉम्बो!
नवीन संशोधन आणि आयुर्वेदाच्या मतानुसार, कॉफीमध्ये चिमूटभर हळद घालून पिल्यास तिचे दुष्परिणाम कमी होत असून अनेक फायदे मिळू शकतात. हळद ही नैसर्गिक अँटिऑक्सिडंट(coffee) आणि अँटी-इन्फ्लेमेटरी घटकांनी परिपूर्ण आहे. त्यामुळे कॉफीचा कॅफिन इफेक्ट संतुलित राहतो.
कॉफी + हळदचे फायदे:
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
ऍसिडिटी, फुगलेपणा आणि पचनाच्या समस्या कमी होतात
दाह कमी होण्यास मदत होते
हिवाळ्यात शरीर उबदार व ऊर्जावान ठेवते
कॉफीचा अतिरेक झाला तरी दुष्परिणाम जाणवत नाहीत
विशेष म्हणजे उपाशीपोटी कॉफी पिणे टाळावे असा सल्ला नेहमी दिला जातो. पण कॉफीमध्ये हळद घातल्यास ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होते. त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी अशी हळदीची कॉफी शरीराला अधिक फायदेशीर ठरते.
हिवाळ्यात आरोग्यासाठी हा छोटासा बदल नक्की करून पाहा. कॉफीचा स्वादही वेगळा आणि आरोग्य फायदेही दुप्पट

हेही वाचा :
राज ठाकरेंना सर्वात मोठा झटका! मनसेची मान्यता रद्द?
हिवाळ्यात गूळ अन् चणे खाल्ल्यास काय होते? याचे 5 फायदे जाणून थक्क व्हालं
सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा हेल्दी पालक मूगडाळीचे आप्पे