कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्याच्या गटबाजी बद्दल बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी”कागल विद्यापीठ”असा उल्लेख केला होता. या विद्यापीठाचे कुलगुरू कोण हे मात्र तेव्हा त्यांनी सांगितले नव्हतं.पण या कागल विद्यापीठाचे कुलगुरूअधून मधून बदलत राहिले.गट आणि तट मात्र तसेच राहिले. सध्या सुरू असलेल्या कागल नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानेदोन कडवे शत्रू एकत्र आले आहेत. जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला कागल मधील या युतीने चकित करून सोडले आहे. लोकांना पागल करणार कागल च राजकारण”सत्तेसाठी(politics) काय पण”अशा स्वरूपाचं आहे.कागल नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित दादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसएकत्र आली आहे. विद्यमानमंत्री हसन मुश्रीफ आणि समरजीत सिंह घाटगे हे दोघे एकत्र आले आहेत. कागलच गटबाजीच राजकारण ज्यांना माहित आहे त्यांना या युतीबद्दल आश्चर्य वाटणार नाही मात्र सर्वसामान्य जनतेला”पागल”करणार हे राजकारण आहे हे मात्र निश्चित इसवी सन 2019 मध्ये समरजीत सिंह घाटगे यांनी कागल विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती.

पण या निवडणुकीत ते हारले आणि तेथे मुश्रीफ निवडून आले. त्यानंतर घाटगे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे ते जिल्हाध्यक्षही बनले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी म्हणून त्यांनी हा मतदारसंघ भाजपसाठी सुरक्षित बनवला होता. पण ऐनवेळी महाराष्ट्राचे राजकारण बदलले आणि भारतीय जनता पक्षाला कागल मधील आपली जागा सोडावी लागली. घाटगे यांची संधी हुकली, मग त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि निवडणूक लढवली. पण ही दुसरी निवडणूक ही ते हरले.2019 ते 2024 या दरम्यानच्या काळात हसन मुश्रीफ यांच्यावर ईडी कडून छापासत्र सुरू झाले होते. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, गडहिंग्लज येथील गोड साखर कारखाना, कैदी चौक येथील मुश्रीफ यांचे निवासस्थान इथे धाडी पडल्या. हसन मुश्रीफ यांना ईडीकडून कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.समरजीत सिंह घाटगे गट खुशीत होता.

समरजीत सिंह घाटगे यांची खुशी ही अल्पकाळ ठरली. कारण अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करूनचाळीस आमदारांना बरोबर घेऊन ते भाजपच्या कृपा छत्राखाली दाखल झाले.त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारणात बदलले. कागल ही त्याला अपवाद नव्हते.राज्याच्या बदलत्या राजकारणाचा फायदा हसन मुश्रीफ यांनाच मोठ्या प्रमाणावर झाला. अटके ऐवजी ते सत्तेत आले. मंत्री बनले. आणि या बदलत्या राजकारणाचा फटका समरजितसिंह घाटगे यांना मात्र बसला.एकूणच या दोघांमधील राजकीय वैरत्व पराकोटीच्या टोकाला गेले होते. या पार्श्वभूमीवर कागलसारख्या छोट्या नगरपालिकेच्यानिवडणुकीसाठी हे दोघे एकत्र आल्यामुळे राजकीय खळबळ तर उडाली आहेच.शिवाय अवसानघातकी राजकारणाचा एक नवा चेहरा समोर आलेला आहे.शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विक्रम सिंह घाटगे आणि हसन मुश्रीफ हे दोघे एकत्र होते. मुश्रीफ हे नंतर मंडलिक गटात गेले.

कारण तेव्हा मंडलिक विरुद्ध घाटगे असे गटबाजीचे राजकारण (politics)जोरात होते. मुश्रीफ यांनी नंतर जिल्हा बँकेच्या राजकारणात सदाशिवराव मंडलिक गटाला सोडचिट्टी दिली. नंतर संजय मंडलिक विरुद्ध हसन मुश्रीफ, संजय घाटगे विरुद्ध हसनमुश्रीफ,असे गटातटाचे राजकारणया तालुक्यात सुरू होते.राज्याच्या राजकारणातहसन मुश्रीफ, संजय मंडलिक, हे महायुती म्हणून एकत्र आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र असताना कागल मध्येमहायुती मधील हसन मुश्रीफ आणि महाविकास आघाडी मधील समरजीत सिंह घाटगेहे पालिका निवडणुकीत एकत्र आले आहेत.गेल्या 40 ते 50 वर्षातील कागलचे राजकारण पाहिले तर ते पक्षीय पातळीवर कधीही नव्हते. गटा तटाचेच राजकारण होते. गट प्रथम आणि पक्ष दुय्यम असा इथे प्रकार होता आणि तो आजही आहे. पण दोन गट एकत्र आले आहेत हे मात्र पहिल्यांदाच घडलेले आहे.

हेही वाचा :

कॉफीमध्ये हा घटक मिक्स करून प्या आणि मिळवा असंख्य फायदे

लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! E-KYC संदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

भारत गंभीर संकटात; मध्यम वर्गासोबत… 2 कोटी नागरिकांना थेट धोका!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *