ओला-उबरसारख्या खाजगी सेवांना टक्कर देण्यासाठी आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.(ticket) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ लवकरच एक नवीन अ‍ॅप सुरू करणार आहे, जे ओला-उबरच्या धर्तीवर कार्यान्वित होईल. या माध्यमातून प्रवाशांना घरबसल्या बस बुकिंग, थेट लोकेशन ट्रॅकिंग, वेळापत्रक पाहणे, कस्टमर सपोर्ट अशा सुविधा मिळणार आहेत.हा निर्णय परिवहन खात्याच्या अलीकडील बैठकीत घेण्यात आला असून, या अ‍ॅपच्या माध्यमातून ST महामंडळाची सेवा अधिक प्रवासी-केंद्रित, डिजिटल आणि स्मार्ट होणार आहे.

सरकारचा दावा आहे की यामुळे महामंडळाचं उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.हे सरकारी अ‍ॅप ST महामंडळाच्याच ताब्यात राहणार असून, प्रवाशांना यातून तिकीट आरक्षण, बस कुठे आहे हे पाहणे, वेळापत्रक माहिती, आणि तक्रार निवारण केंद्र अशी अनेक युजर-फ्रेंडली फीचर्स मिळणार आहेत.या निर्णयामुळे ST सेवेला नवसंजीवनी मिळेल आणि प्रवास अधिक डिजिटल आणि सोयीस्कर बनेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ST महामंडळाच्या आर्थिक स्थितीला बळकटी देण्यासाठी सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.(ticket) ST च्या 81 डेपोच्या जमिनींवरील विकासासाठीचा कालावधी 60 वर्षांवरून 97 वर्षांपर्यंत वाढवण्यात आला आहे. या जमिनी खासगी भागीदारांना कालबद्ध भाडेपट्टी तत्त्वावर देण्यात येणार आहेत.ही जमीन ‘अ’, ‘ब’, आणि ‘क’ अशा तीन गटांत विभागली जाईल आणि विकासासाठी खुली करण्यात येईल. यामुळे महामंडळाला दीर्घकालीन उत्पन्नाचा स्रोत मिळण्याची शक्यता आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही महिन्यांपूर्वी सादर केलेल्या श्वेतपत्रिकेनुसार, ST महामंडळाचं संचयी नुकसान 10,000 कोटी रुपयांहून अधिक झालं आहे. गेल्या 5 वर्षांत या नुकसानीत 124% वाढ झाल्याची नोंद आहे. मागील 45 वर्षांत केवळ 8 वर्षे महामंडळाने नफा मिळवला, उर्वरित सर्व वर्षांत तोटा झाल्याचे उघड झाले आहे. (ticket) यामुळे महामंडळाच्या कार्यक्षमतेवर आणि निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

हेही वाचा :

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *