बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्या घरी काही दिवसांपूर्वी चिमुकल्याचे आगमन झाले होते. चाहत्यांमध्ये या स्टार कपलच्या लेकाच्या नावाबाबत उत्सुकता होती. अखेर जवळपास एका महिन्यानंतर त्यांनी आपल्या बाळाचे नाव जाहीर केले असून हा क्षण त्यांनी एका खास पोस्टद्वारे चाहत्यांशी शेअर केला आहे. परिणितीच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.परिणितीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती आणि राघव आपल्या बाळाच्या पायाला किस करताना दिसतात. दुसऱ्या फोटोत दोघेही बाळाचे पाय हातात घेतलेले दिसतात. या पोस्टसोबत त्यांनी बाळाचे नाव (name)आणि त्या नावामागील अर्थ सुंदरपणे स्पष्ट केला आहे. चाहत्यांसाठी हा क्षण अगदी भावनिक आणि आनंददायी ठरला.

परिणिती आणि राघव यांनी आपल्या लेकाचं नाव ‘नीर’ ठेवलं आहे. ‘नीर’(name) या शब्दाचा मूळ अर्थ पाणी असा आहे. त्यांनी बाळाच्या नावासोबत संस्कृतमधील एक ओवीही शेअर केली आहे. “जलस्य रूपम्, प्रेमस्य स्वरूपम् – तत्र एव नीर”. याचा अर्थ, “जे पाण्याचे रूप आहे आणि प्रेमाचे स्वरूप आहे, तोच नीर” असा होतो. परिणितीने लिहिले आहे की, आमच्या आयुष्यात आलेल्या या छोट्या जीवाने आमच्या हृदयात शाश्वत आणि परिपूर्ण आनंद भरला असून म्हणूनच आम्ही त्याला ‘नीर’ असे नाव दिले आहे.ही पोस्ट शेअर करताच हजारो चाहत्यांनी आणि बॉलिवूड तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक नामवंतांनी या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. नीर नावाचा अर्थ जितका शांत, तितकाच पवित्र आणि सुंदर असल्याने हे नाव चाहत्यांमध्येही पसंतीस उतरले आहे. परिणिती आणि राघव यांनी या नावाद्वारे आपल्या भावनांना अतिशय हृदयस्पर्शी व्यक्त केले आहे.

परिणिती चोप्राने 19 ऑक्टोबर 2025 रोजी मुलाला जन्म दिला होता. त्या वेळीही तिने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही गुड न्यूज दिली होती. त्यानंतर चोप्रा आणि चड्ढा कुटुंबात आनंदाचं वातावरण पाहायला मिळत होतं. मात्र नाव जाहीर न केल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता कायम होती.आता बाळाचे नाव ‘नीर’ जाहीर झाल्यानंतर अनेकांनी या जोडप्यास भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिला आहे. परिणितीने शेअर केलेल्या फोटोंना लाखो लाईक्स मिळत असून, चाहत्यांकडून लहान नीरसाठी गोड संदेशांची रेलचेल सुरू आहे. सेलिब्रिटी जगतातही या नावाच्या घोषणेनंतर आनंदाचे वातावरण आहे.

हेही वाचा :

संध्याकाळी सातनंतर होणार पेट्रोल पंप बंद…

२० वर्षीय तरुण अभिनेत्रीने ४० वर्षीय रणवीरसोबत केले पदार्पण…

‘अंगात मस्ती येते ती…’ शरद पवारांच्या पक्षाची अजित पवारांसाठी बॅटींग..

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *