सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीत झालेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये(party) तणाव चिघळलेला दिसत आहे. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या उज्वला थिटे यांनी पोलिस बंदोबस्तात अर्ज दाखल केला होता.

मात्र, सूचकाची सही, प्रभागातील अनुक्रमांक, वयाचा पुरावा आणि मतदान यादीतील त्रुटींसह चार प्रमुख कारणांमुळे त्यांचा अर्ज छाननीत बाद झाला. त्यामुळे भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील बिनविरोध निवडून आल्या. या निकालानंतर राजन पाटील यांचे पुत्र बाळराजे पाटील यांनी गुलाल उधळून जल्लोष केला आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना एकेरी भाषेत आव्हान देत, “अजित दादा, आता बघा आमची ताकद!” अशी जोरदार घोषणा केली.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी बाळराजेंना सुनावत, राजकीय संस्कृतीचे भान ठेवण्याचा सल्ला दिला(party). तर अजित पवार गटाचे युवक उपाध्यक्ष रोहन सुरवसे यांनीही कठोर शब्दांत टीका करत बाळराजे पाटील “अजित पवारांच्या छत्रछायेत वाढले असून आता कृतघ्नपणा करत आहेत,” असा घणाघात केला. अनगरच्या बिनविरोध निवडणुकीपासून सुरू झालेला वाद आता राज्यभरातील चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा :
घडून गेल्यानंतर नाराजी आता उपयोग काय तिचा?
प्रसिद्ध अभिनेत्रीचा 43 व्या वर्षी तिसऱ्यांदा घटस्फोट, थेट म्हणाली, मी अविवाहित असून …
तीन वर्षांच्या मुलीचं लैंगिक शोषण करून डोकं ठेचलं; घरी मृतदेह येताच…