बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानबद्दल चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. त्याच्या चित्रपटांपासून ते त्याच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत. प्रत्येक बातमी चाहते मोठ्या आवडीने फॉलो करतात. सध्या सोशल मीडियावर सलमान खानसंदर्भात एक नवीन ज्योतिषशास्त्रावर आधारित भविष्यवाणी(predictions) प्रचंड व्हायरल होत आहे. या दाव्यानुसार, 2026 सलमानसाठी आव्हानात्मक आणि काहीअंशी कठीण ठरू शकते.प्रसिद्ध ज्योतिषी सुशील कुमार सिंह यांनी एका पॉडकास्टमध्ये केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या मते, सलमान खानला 2026 मध्ये आरोग्याशी संबंधित समस्या जाणवू शकतात आणि त्याच्या फिल्मी करिअरमध्येही हा काळ काहीसा कमजोर राहू शकतो.

सलमान खानचा काळ सध्या चांगला नाही. 2026 मध्ये त्याला आरोग्याशी संबंधित अनेक गोष्टींचा सामना करावा लागू शकतो आणि त्याच्या चित्रपटांमध्येही काही खास चमक दिसणार नाही. काही काळासाठी त्याचा बॉलिवूडमधील प्रभावही कमी होण्याची शक्यता आहे असं सुशील कुमार सिंह यांनी सांगितलं. काही महिन्यांपूर्वी आणखी एका ज्योतिषी गीतांजली सक्सेना यांनीही सलमान खानसाठी कठीण काळ असल्याचे सांगितले होते. त्यांच्या मते: 2024 सलमानसाठी व्यावसायिकदृष्ट्या खास नाही. या वर्षी त्याने नवीन चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय घेऊ नये.

2026 बद्दल त्यांनी चेता‌वणी देत सांगितले की, एप्रिल 2026 नंतर सलमानने खूप सावध राहायला हवे. अपघात, शस्त्रक्रिया किंवा आरोग्याच्या मोठ्या समस्या उद्भवू शकतात. परंतु, जरी काही झाले तरी तो त्यातून पूर्णपणे सावरेल असं त्यांनी सांगितलं.
काही महिन्यांपूर्वी एका टॉक शोमध्ये सलमान खानने उघड केले (predictions)की ते ट्रायजेमिनल न्यूराल्जिया नावाच्या अतिशय वेदनादायक आजाराशी लढत आहे. त्याने सांगितले होते की, खाणे पिणेही कठीण झाले होते. नाश्ता पूर्ण करण्यास 1.5 तास लागत होता. ही वेदना त्याच्या रोजच्या आयुष्याला त्रासदायक ठरली होती.

सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सलमानचा शेवटचा चित्रपट ‘सिकंदर’ होता, जी बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही. सध्या तो ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय तो टीव्हीवरील सर्वात चर्चित शो ‘बिग बॉस 19’ चे होस्टिंगही करत आहे.

हेही वाचा :

लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार? महत्वाची माहिती आली समोर

लक्ष द्या लाडक्या बहिणींनो! आचारसंहिता लागू, नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार

लोकलमध्ये घेतला भाचीचा जीव, मामाच्या ‘त्या’ कृत्याने संताप…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *