मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (sisters)योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेला राज्य सरकारकडून डिसेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ मिळाल्यानंतरही पात्र महिलांच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबतची प्रतीक्षा वाढत चालली आहे. राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू असली तरीही या योजनेचा १५०० रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला मतमोजणी असताना त्याआधीच हप्ता वितरित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नोव्हेंबर महिन्याचे १९ दिवस उलटल्यानंतरही अधिकृत घोषणा न झाल्याने महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, शासन स्रोतांकडून मिळालेल्या संकेतांनुसार महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाभधारकांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात.
दरम्यान, या योजनेंतर्गत ई-केवायसी अनिवार्य असून प्रक्रिया पूर्ण न केल्यास पुढील हप्ते मिळणार नाहीत, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे. तांत्रिक समस्यांवर उपाय म्हणून पोर्टलमध्ये काही महत्त्वाचे बदलही करण्यात आले आहेत. घटस्फोटित किंवा विधवा महिलांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक सूचना देत, ई-केवायसीसोबत मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयीन आदेश यांच्या प्रती संबंधित जिल्ह्याच्या महिला आणि बालविकास अधिकाऱ्यांकडे जमा करणे आवश्यक आहे. लाडकी बहीण (sisters)योजनेतील हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार असल्याने लाखो महिलांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :
लोकलमध्ये घेतला भाचीचा जीव, मामाच्या ‘त्या’ कृत्याने संताप…
परिणिती चोप्रा-राघव चड्ढाने लेकाचं नाव केलं जाहीर; अर्थ आहे फारचं छान!
संध्याकाळी सातनंतर होणार पेट्रोल पंप बंद…