इचलकरंजीतील अयोध्या कॉलनीमध्ये झालेल्या घरफोडी प्रकरणाचा वेगाने छडा लावत शिवाजीनगर पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. चार दिवसांपूर्वी विमलादेवी केसरवाणी यांच्या बंगल्यात झालेल्या चोरीतील रोकडसह सुमारे 10 तोळे सोने आणि 1 किलो चांदी असा एकूण 11 लाख 16 हजारांचा ऐवज(Property) पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणात सराईत गुन्हेगार आकाश राजेंद्र देशिंगे (22, रा. शहापूर) आणि अविनाश उर्फ मनोज विजय वाघमोरे (28, रा. पाचोड, जि. छत्रपती संभाजीनगर) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांनी दिली.

तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला. तपासात उघड झाले की दोघांनी चोरीनंतर दागिन्यांची(Property) वाटणी करून ते स्वतःच्या घरात लपवून ठेवले होते. हे सर्व दागिने अखेर पोलिसांना मिळाले आहेत. आकाश देशिंगे हा यापूर्वीही चोरीच्या गुन्ह्यात अडकलेला असून दोघेही झटपट पैसे कमावण्यासाठी चोरीचा मार्ग अवलंबल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
या कारवाईत पोलिस उपअधीक्षक विक्रम गायकवाड आणि पो.नि. शिवाजी गायकवाड यांचा विशेष सहभाग होता. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

हेही वाचा :
सलमान खानसाठी 2026 कठीण? ज्योतिषांनी केली धक्कादायक भविष्यवाणी
लक्ष द्या लाडक्या बहिणींनो! आचारसंहिता लागू, नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार
लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार? महत्वाची माहिती आली समोर