कर्नाटकातील नेलमंगला येथे एका निवृत्त DySP(Professor) यांच्या मुलीवरील गंभीर छळाची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनीता नावाच्या या तरुणीने आपल्या पती डॉक्टर गोवर्धन आणि सासरे प्रोफेसर नगराजूंवर हुंडा छळ, अश्लील टिप्पण्या आणि शारीरिक त्रास यासह गंभीर आरोप केले आहेत. अनीताचे लग्न २ नोव्हेंबर २०२३ रोजी झाले होते आणि तिच्या वडिलांनी लग्नात सुमारे २५ लाख रुपये, सोने-चांदी व इतर खर्च केले होते. मात्र लग्नानंतर फक्त १५ दिवसांतच पतीने माहेरच्या मालमत्तेचा आणि भाड्याच्या उत्पन्नातील हिस्सा मागण्यास सुरुवात केली, तसेच सासऱ्याने अनीताकडे अश्लील मागण्या ठेवलेल्या असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

FIR नुसार, सासऱ्याने अनीताला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला, तसेच अश्लील टिप्पण्या केल्या. अनीताच्या तक्रारीत असे नमूद आहे की, सासऱ्याने तिला सांगितले, “लग्नाला इतके महिने झाले, गुड न्यूज का नाही?”, “माझा मुलगा तुझ्यासोबत संबंध ठेवतो की नाही? नाही तर मीच येतो,” आणि “मॉडर्न मुलींसारखे अर्धे कपडे घालून(Professor) माझ्यासमोर ये.” या सर्व प्रकरणामुळे अनीताने मानसिक व आर्थिक त्रास सहन करत पोलिसांचा आधार घेतला.
नेलमंगला पोलिसांनी अनीता याच्या तक्रारीवरुन पती, सासरा आणि सासूविरुद्ध हुंडा छळासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

हेही वाचा :
सोन्याचा भाव धडाम, झटक्यात 5 हजारांनी स्वस्त; आता 10 ग्रॅमसाठी फक्त…
इचलकरंजी येथील घरफोडीतील 11.16 लाखांचा ऐवज हस्तगत
सलमान खानसाठी 2026 कठीण? ज्योतिषांनी केली धक्कादायक भविष्यवाणी