भारतीय घरांमध्ये जेवणानंतर गोड खाण्याची प्रथा पिढ्यान्पिढ्या चालत आली आहे, पण त्यामागे केवळ सवय नाही, तर शरीरशास्त्रही दडलेले आहे. पूर्वी लोक जेवणानंतर गुळाचा तुकडा आणि तुपाचा(ghee) थेंब खात असे, जे आयुर्वेदानुसार पचनसंस्थेला चालना देत, ऊर्जा वाढवत आणि शरीराला उबदार ठेवत असे. आजकाल लोक साखर, केक किंवा मिठाई जास्त खात आहेत, ज्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम दिसत आहेत.

आयुर्वेद सांगतो की गूळ आणि तूप हे नैसर्गिक टॉनिक आहेत, जे पचन सुधारतात, पोट हलकं ठेवतात आणि गॅस, आम्लपित्त, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या कमी करतात. तुपात(ghee) असलेले ब्युटीरिक अ‍ॅसिड आतड्यांच्या हालचाली सुधारते आणि विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते. हाडांसाठीही गूळ आणि तूप उपयुक्त आहेत; गुळातील मॅग्नेशियम हाडांना पोषण देते, तर तुपातील व्हिटॅमिन K2 कॅल्शियमच्या शोषणात मदत करते.

गूळ आणि तूप नैसर्गिक रक्तशुद्धीकारक आणि त्वचेचा पोषण करणारे देखील आहेत. मासिक पाळीच्या काळात हे मिश्रण पोटदुखी, क्रॅम्प्स आणि अशक्तपणा कमी करण्यास उपयुक्त ठरते. गुळातील कार्बोहायड्रेट्स तत्काळ ऊर्जा देतात, तर तुपातील निरोगी फॅट्स ही ऊर्जा दीर्घकाळ टिकवतात.

हिवाळ्यात विशेषतः हा उपाय शरीराला उबदार ठेवतो आणि दिवसभर उत्साही ठेवतो. आयुर्वेदानुसार, जेवणानंतर साधारण १० मिनिटांनी एक चमचा तूप आणि एक छोटा गुळाचा तुकडा खाल्यास पचन सुधारते, शरीर हलकं वाटतं आणि ऊर्जा टिकते. हा सोपा पण प्रभावी उपाय आजही तितकाच आवश्यक आहे जितका हजारो वर्षांपूर्वी होता.

हेही वाचा :

40 व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार सोनम कपूर…

‘मी बराचवेळ त्याच्या कमरेला पकडून उभी होते’, गिरीजाने…

दाम्पत्यावर केलेला तो हल्ला विसर्जनातील वादातूनच; कागलमधून चौघांना अटक

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *