हिवाळ्याच्या हंगामात आरोग्य टिकवण्यासाठी योग्य आहार घेणे आणि पोषक ड्रायफ्रुट्स खाणे अत्यंत गरजेचे ठरते. यामध्ये अक्रोडाचे(Walnut) महत्व खूप आहे. तज्ज्ञांच्या मते, दररोज किमान दोन अक्रोड खाल्ल्याने शरीर उबदार राहते, हृदय आणि मेंदूचे आरोग्य सुधारते तसेच वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

अक्रोड(Walnut) भिजवून खाण्याची शिफारस केली जाते कारण भिजवल्यानंतर त्यातले काही चांगले एंजाइम सक्रिय होतात, जे पचण्यास सोपे होतात आणि फायटिक ॲसिड कमी होतो, ज्यामुळे जीवनसत्त्वे व खनिजे शरीरात अधिक सहज शोषली जातात.
अक्रोडामध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात, जे मेंदूच्या पेशींसाठी आवश्यक आहेत. नियमित भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारते, तसेच रक्तातील चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढते आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो.
याशिवाय, अक्रोडातील फायबर पचनसंस्था निरोगी ठेवतो व बद्धकोष्ठतेपासून आराम देतो. तसेच त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेला फ्री रॅडिकल्सच्या हानिकारक प्रभावापासून संरक्षण करतात. त्यामुळे हिवाळ्यात सकाळी भिजवलेले अक्रोड खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

हेही वाचा :
आधारकार्डमध्ये होणार सर्वात मोठा बदल…
अर्धे कपडे घालून ये, मी तुझ्यासोबत… प्रोफेसर सासऱ्याची सूनेकडे….
सोन्याचा भाव धडाम, झटक्यात 5 हजारांनी स्वस्त; आता 10 ग्रॅमसाठी फक्त…