गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात ठेवून दिगंबर कांबळे आणि त्यांच्या पत्नीवर एडक्याने हल्ला करणाऱ्या चार संशयितांना शिरोली पोलिसांनी बुधवारी सायंकाळी कागल येथून ताब्यात घेतले. 3 सप्टेंबर रोजी कोरगावकर कॉलनी परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दिगंबर कांबळे व संशयितांमध्ये किरकोळ वाद झाला होता. हा वाद काही वेळात मिटला असला, तरी संशयितांनी त्याचा राग मनात धरून ठेवला आणि 19 नोव्हेंबरच्या रात्री दिगंबर आणि त्यांच्या पत्नीवर अचानक हल्ला(attack) केला.

सुमारे रात्री 9 वाजता दिगंबर कांबळे, पत्नी आरती आणि मुलगा वल्लभ श्रीराम स्वीट मार्टजवळून घरी जात असताना, संशयितांनी आधीपासून दबा धरून दिगंबर यांच्यावर एडक्याने वार केले. या हल्ल्यात (attack)दिगंबर गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पत्नी आरती कांबळे देखील मारहाणीत जखमी झाली.हल्ल्याच्या वेळी परिसरात काही क्षण गोंधळ निर्माण झाला, मात्र आरोपी चारचाकीत पळून गेले. घटनेनंतर शिरोली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदार व संशयितांच्या परिचितांकडून माहिती घेऊन चौघांचा माग शोधला आणि बुधवारी सायंकाळी सुमारे 7 वाजता कागल येथे त्यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी सांगितले की हा हल्ला पूर्णपणे पूर्ववैमनस्यातून झाला असून चारही संशयितांविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद केली जाईल. प्राथमिक तपासात हा हल्ला नियोजित असल्याचे दिसून आले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, संशयितांनी वापरलेले एडक व पळण्यासाठी वापरलेली चारचाकी याबाबतही तपास सुरू आहे.

हेही वाचा :
शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी! शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय
‘बाबा मला मारलं….’, उद्धव ठाकरेंनी उडवली एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याची खिल्ली
प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनीने एकत्र येत दिली गूडन्यूज