बॉलिवूडची फॅशन क्वीन आणि स्टाईल आयकॉन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनम कपूर हिने गुरुवारी सर्वांना आनंदाची बातमी दिली. सोनमने इन्स्टाग्रामवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. यात ती हॉट-गुलाबी रंगाच्या वूलन सूटमध्ये दिसत आहे. मात्र, तिच्या स्टायलिश लूकपेक्षा जास्त चर्चा झाली ती तिच्या दिसू लागलेल्या(mother) बेबी बंपची.फोटोंमध्ये सोनम स्वतःच्या बेबी बंपला प्रेमाने हात ठेवून पोज देताना दिसते. फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने फक्त एकच शब्द लिहिला आहे. ‘MOTHER’. हा शब्द पाहताच तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लहर पसरली आणि काही क्षणातच कमेंट सेक्शनमध्ये शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला.

सोनम कपूर आणि आनंद आहूजा यांनी मे 2018 मध्ये लग्न केले. 2022 मध्ये त्यांना पहिला मुलगा झाला वायु. काही महिन्यांपासून सोनमच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीबद्दल(mother) चर्चा सुरु होती. ऑक्टोबरमध्ये ती दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याच्या बातम्या आल्या होत्या, मात्र सोनमने तेव्हा कोणतेही वक्तव्य केले नव्हते.आता मात्र, सोनमने स्वतः फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी जाहीर केली असून चाहत्यांनीही तिचे मनापासून अभिनंदन केले आहे. तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा करण्याच्या एक दिवस आधी सोनमने दोन ग्लॅमरस लुक्सचे फोटो शेअर केले होते आणि कॅप्शन दिले होते ‘शादी के लिए तैयार… दो दिन और दो लुक जो मुझे पसंद आए!’

एका फोटोमध्ये सोनम निळ्या रंगाच्या ट्रेडिशनल साडीत दागिन्यांसह एलिगंट दिसत होती तर दुसऱ्या फोटोमध्ये ती मॉडर्न स्लीक आउटफिटमध्ये स्टायलिश अवतारात झळकत होती.सोनमला शेवटचे 2023 मध्ये रिलीज झालेल्या ‘ब्लाइंड’ या क्राइम थ्रिलर चित्रपटात पाहिले गेले होते. शोमे मक्खीजा दिग्दर्शित या चित्रपटात तिने अंध पोलिस अधिकारी ही भूमिका साकारली होती, जी एका सीरियल किलरचा पाठलाग करते. सोनमच्या या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते.

हा चित्रपट 2011 मधील एका कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. या चित्रपटात पुरब कोहली, विनय पाठक आणि लिलेट दुबे यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या.सोनम ही दिग्गज अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी. तिने करिअरची सुरुवात संजय लीला भंसाळींच्या ‘ब्लॅक’ या चित्रपटात असिस्टंट डायरेक्टर म्हणून केली.2007 मध्ये तिने भंसाळींच्याच ‘सावरिया’ मधून अभिनयात पदार्पण केले.

हेही वाचा :

दाम्पत्यावर केलेला तो हल्ला विसर्जनातील वादातूनच; कागलमधून चौघांना अटक
शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी! शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय
‘बाबा मला मारलं….’, उद्धव ठाकरेंनी उडवली एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याची खिल्ली

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *