कर्नाटक : चिक्कबल्लापुरमध्ये सोशल मीडिया वापरून महिलांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकरण समोर आले आहे. आरोपी सीएम गिरीश उर्फ साईसुदीप, चिंतामणी नगरचा रहिवासी, विवाहीत महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट(requests) पाठवून ओळख करून घेईन, त्यांना प्रेमात पाडून लग्नाचं आमिष दाखवत त्यांच्याशी शारीरिक शोषण केल्याचा आरोप आहे.

तीन महिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्यांनी सांगितले की, आरोपीने लग्नाचे वचन देऊन त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि त्यांचे अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड(requests) करून ब्लॅकमेलिंग करून लाखो रुपये उकळले.पोलिस तपासात समोर आले की आरोपीने नंदागुडी, बेंगळुरू, चिक्कबल्लापूर आणि बांगरपेटसह 5 पेक्षा अधिक महिलांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
सामाजिक कार्यकर्ते कृष्णमूर्ती यांच्याद्वारे महिलांनी चिंतामणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी महिलांना आणि नागरिकांना सोशल मीडियावर सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.विशेष म्हणजे, सोशल मीडिया आणि सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये सध्या लक्षणीय वाढ झाली आहे. पोलिसांचा सल्ला आहे की, कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यांची माहिती नीट तपासावी आणि शंकास्पद व्यवहार झाल्यास तत्काळ पोलिसांकडे जाणे आवश्यक आहे.

हेही वाचा :
जयसिंगपूरमध्ये सतेज पाटील, महाडिक, राजू शेट्टी साथ साथ
नोव्हेंबरचा शेवट अन् या राशींना मिळणार भाग्याची साथ
रात्री झोपण्याआधी गुळात मिक्स करून खा साजूक तूप, शरीरात दिसतील हे जादुई बदल