कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या महापालिका व नगरपंचायत निवडणुकांत राजकीय नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी एकमेकांचे राजकीय(Political) शत्रू एकत्र, तर काही ठिकाणी मित्र एकमेकांना आव्हान देत आहेत. कागल, चंदगड आणि जयसिंगपूर या नगरपालिकांमध्ये घडलेल्या घटनांमुळे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.चंदगड नगरपंचायत: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांचे नेते – अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ व शरद पवार गटाच्या डॉ. नंदाताई बाभुळकर – यांनी एकत्र येत पहिला धक्का दिला.

कागल नगरपालिका: गेल्या 11 वर्षांपासून राजकीय विरोधक असलेले हसन मुश्रीफ व समरजित घाटगे अचानक एकत्र आले, ज्यामुळे निवडणुकीच्या रंगभूमीवर जोरदार खळबळ माजली.जयसिंगपूर नगरपालिका: येथे भाजपने आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह आघाडी करण्याचा विचार करत असताना चर्चा फिस्कटली. त्यानंतर राजू शेट्टी, तसेच सतेज पाटील व महाडिक गट यांची टोकाची विरोधकता बाजूला ठेवून एकत्र येणारी आघाडी तयार झाली.
सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक व खा. धनंजय महाडिक यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे सख्य व प्रत्येक निवडणुकीत रंगणारा सामना लक्षात घेतल्यास, जयसिंगपूरमध्ये या नव्या आघाडीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.जिल्ह्यातील निवडणुकीच्या(Political) या विचित्र आघाड्या, राजकीय शत्रूंचा एकत्र येण्याचा खेळ आणि पारंपरिक गटांच्या संघर्षामुळे कोल्हापूरची निवडणूक ही गमतीशीर आणि नाट्यमय ठरणार आहे.

हेही वाचा :
नोव्हेंबरचा शेवट अन् या राशींना मिळणार भाग्याची साथ
रात्री झोपण्याआधी गुळात मिक्स करून खा साजूक तूप, शरीरात दिसतील हे जादुई बदल
सकाळी नाश्त्यात बनवा पोहे रोल, नोट करा कुरकुरीत आणि चविष्ट रेसिपी