नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा अनेकांसाठी आनंदाची आणि यशाची वेळ ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, 29 नोव्हेंबर 2025 रोजी सौंदर्य, प्रेम, संपत्ती आणि नशीबाचा (luck)ग्रह शुक्र आपले नक्षत्र बदलून अनुराधा नक्षत्रात प्रवेश करेल. हे ग्रह भ्रमण अत्यंत शुभ मानले जाते आणि यामुळे अनेक राशींवर सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत.

कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेष शुभ(luck) ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन संधी मिळतील, व्यवसायात प्रगती होईल, आणि गुंतवणुकीतून चांगला फायदा होईल. वाहन किंवा घर खरेदीसारख्या महत्वाच्या निर्णयांसाठी ही योग्य वेळ आहे. प्रेमविवाहाच्या योजना यशस्वी होतील आणि उत्पन्नात लक्षणीय वाढ दिसून येईल.
धनु
धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नवीन संधी आणि लोकांशी प्रभावी संवाद घेऊन येणार आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून गुंतवणूक फायदेशीर ठरेल. लोकांवर तुमचा प्रभाव वाढेल आणि नवीन व्यवसाय संधी तुमच्या मार्गी येतील. मित्र आणि सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल आणि तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल.
मीन
मीन राशीच्या लोकांच्या भौतिक सुखसोयी या काळात वाढतील. तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि वाहन किंवा घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल. कला आणि सर्जनशीलतेत चमक येईल, नवे मित्र बनतील, आणि कामाच्या ठिकाणी तुमची ओळख वाढेल. विवाहितांसाठी हा काळ नातेसंबंधांना गोडवा आणेल. उत्पन्न वाढेल आणि समाजात आदर वाढेल.

हेही वाचा :
रात्री झोपण्याआधी गुळात मिक्स करून खा साजूक तूप, शरीरात दिसतील हे जादुई बदल
सकाळी नाश्त्यात बनवा पोहे रोल, नोट करा कुरकुरीत आणि चविष्ट रेसिपी
40 व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार सोनम कपूर…