भारतातील सर्वात लोकप्रिय आणि जगातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या बिस्किटांपैकी अग्रस्थानावर असलेल्या पार्ले-जी बिस्किटामागील(biscuit) इतिहास आणि तथ्ये पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. १९२९ मध्ये मुंबईतील विलेपार्ले येथे फक्त १२ कामगारांपासून सुरू झालेली ही कंपनी आज तब्बल ८ हजार कोटी रुपयांची वार्षिक विक्री करणारा जागतिक ब्रँड बनला आहे.पार्ले कंपनीचे संस्थापक मोहनलाल दयाळ चौहान यांनी स्वातंत्र्यलढ्यातील स्वदेशी विचारसरणीने प्रेरित होऊन या उद्योगाची सुरुवात केली होती. बिस्किट उत्पादन कला त्यांनी जर्मनी दौऱ्यात शिकली आणि त्यानंतर तब्बल ६० हजार रुपयांमध्ये परदेशातून अत्याधुनिक यंत्रे आयात करून उत्पादन सुरू केले.

सुरुवातीला या बिस्किटाला ‘पार्ले ग्लुको’ असे नाव होते. १९८० मध्ये नाव बदलून ‘पार्ले-जी’ करण्यात आले. ‘G’ चा अर्थ आधी “Glucose” असला तरी नंतर कंपनीने त्याचा अर्थ “Genius” असा सांगत ब्रँडची ओळख अधिक मजबूत केली.या बिस्किटाइतकीच(biscuit) चर्चा त्याच्या पॅकेटवरील लहान मुलीच्या छायाचित्राची झाली आहे. अनेक वर्षे त्या मुलीची ओळख एक रहस्य बनून राहिली आणि त्याबद्दल विविध अफवा पसरल्या—कधी ती इन्फोसिस अध्यक्षा सुधा मूर्ती असल्याचं सांगितलं गेलं तर कधी तिचं नाव नीरू देशपांडे किंवा गुंजन दुंडानिया असल्याचाही दावा करण्यात आला.

मात्र, अखेर पार्ले-जीचे उत्पादन व्यवस्थापक मयंक शाह यांनी या सर्व अंदाजांना पूर्णविराम दिला. त्यांनी स्पष्ट सांगितले की, पॅकेटवरील मुलगी खऱ्या व्यक्तीची नाही, तर १९६० मध्ये कलाकार मगनलाल दहिया यांनी तयार केलेली एक कलाकृती आहे.
आजही पार्ले-जीची चव, किंमत आणि पॅकेजिंग तसंच टिकून आहे. बदलत्या काळातही हे बिस्किट लाखो भारतीयांच्या चहासोबतची सवय, भावनांची आठवण आणि बालपणाची चव बनून कायम आहे.

हेही वाचा :

विशालकाय माशाने चक्क जिवंत माणसाला गिळलं, अर्धे शरीर आत तर अर्धे बाहेर… Video Viral

सेलमध्ये या 5 स्मार्टफोन्सवर मिळणार आकर्षक डिल्स, ऑफर्स पाहून व्हाल हैराण

राष्ट्रवादीला संधी द्या; हातकणंगलेचा स्वर्ग करू व चेहरा बदलू – मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *