समुद्राचे जग आपल्याला वाटते तितके सामान्य नाही. खोल पाण्यात अनेक असे जीव दडलेले आहेत ज्यांचा सुगावा माणवाला अजूनही लागलेला नाही. पाण्याचा काही अंशी भाग अजूनही रहस्यमयी आहे ज्याचा शोध घेतला गेलेला नाही. अशातच आता इंटरनेटवर एका थरारक व्हिडिओने धुमाकूळ माजवला आहे. या व्हिडिओमध्ये एका विशालकाय माशाने चक्क जिवंत माणसाला गिळंकृत गेल्याचे भयावह दृश्य दिसून येत आहे. व्हिडिओतील हे दृश्य चित्रपटातील कोणत्या हॉरर सीनहून कमी नाही. यात काहीजण व्यक्तीला माशाच्या(fish) शरीराबाहेर काढतानाही दिसून येतात. चला या घटनेत पुढे काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये विशालकाय मासा ज्याने व्यक्तीचा आधीच गिळंकृत केल्याचे दिसून येते. व्यक्तीचे जवळपास अर्धे माशाच्या आत असते आणि उरलेले शरीर हे त्याच्या तोंडाबाहेर असते. त्याचे मित्र माशाच्या तोंडातून व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी सर्वेतोपरी प्रयत्न करत असतात. एकाने व्यक्तीचे पाय पकडलेले असते तर दुसऱ्याने त्याचे तोंड आणि यातच तिसरा मित्र एका लाकडी काढीने माशाच्या (fish)शरीरावर वार करताना दिसतो. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळते आणि व्यक्ती सुखरुप माशाच्या तोंडातून बाहेर पडतो. हा व्हिडीओ पाहायला अगदी खरोखरचा वाटत आहे. परंतू हा एक एआय जनरेटेड व्हिडीओ आहे. व्हिडिओमध्ये घटना खरी असल्याचा दावा केला असला तरी यातील दृश्ये हा एआय कंटेट असल्याचा पुरावा देतात. अनेक यूजर्सनेही याला एआयद्वारे तयार केल्याचे मत व्यक्त केले आहे.

सर्वांना क्षणभरासाठी घाबरवणारा हा व्हिडिओ @yeeezyyy360 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘नदीत कॅटफिशचा धक्कादायक हल्ला, मित्रांनी माणसाला सुरक्षित ठिकाणी खेचले’. व्हिडिओला आतापर्यंत 9.3 मिलियन व्यूज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “त्याची टोपी पडली नाही यावर माझा विश्वासच बसत नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जरी ते एआय असले तरी, मी अजूनही थोडेसे घाबरतो! या भीतीमुळे मी नद्या, तलाव किंवा समुद्रात पोहणार नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “टोपी तशीच राहिली, हा खरा व्हिडिओ नसू शकतो”.

हेही वाचा :

स्मृती मानधनाच्या वडिलांनंतर पलाश मुच्छलची प्रकृती बिघडली

Gemini AI इंटीग्रेशनसह अपडेट झाले हे खास फीचर्स

डॉ. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरण: पंकजा मुंडे यांच्या पीएला अटक

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *