सध्या सोशल मीडियाच्या जगात लोकांना रिल बनवण्याचे वेडं लागले आहे. १५ ते ३० सेकंदाच्या रिल्स साठी, काही लाईक्स आणि व्ह्यूजसाठी लोक आपला जीव धोक्यात घालत आहे. कुठे बाईकवर(bike) उभे राहून चालवण्याचा स्टंट करत आहेत, तर कुठे कारच्या टपावर बसून नाचण्याचा स्टंट करत आहे. कधी कोण काय उपद्वाप करेल याचा नेम नाही. यामुळे अशा हिरोगिरी करणाऱ्यांचा जीव धोक्यात येत आहे, तर आसपासच्या लोकांनाही याचा त्रास भोगावा लागत आहे. सध्या असाच एक स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका तरुणाला बाईक हवेत उचलून स्टंट करणं चांगलंच महागात पडलं आहे. त्याच्यासोबत जे घडंल भयकंर की तो पुढे उभ्या आयुष्यात अशा स्टंटबाजीचे धाडस करणार नाही. पण हे देखील सांगता येत नाही की कधी अंगताली स्टंटबाजीचे किडे वळवळतील.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुण हायवेवर वेगाने स्पोर्ट्स बाईक पळवत आहे. याचा व्हिडिओ त्याचा मित्राने रेकॉर्ड केला आहे. तुम्ही पाहू शकता की, तरुण वेगाने बाईक पळवत असतो. याच वेळी अचानक तो बाईवर उभे राहून गाडी चालवायला लगतो. नंतर तो अचानक बाईकचा वेग वाढवतो आणि बाईक हवेत उचलतो अन् इथेच खेळ संपतो. तरुण बाईक हवेत उचलून घेतो पण काही अंतरावर जाताच त्याचा तोल जातो आणि तरुण बाईकवरुन खाली पडतो. तरुण इतक्या जोरात आदळतो की पाहून तुमच्याही अंगावर शहारे येतील. व्हिडिओमध्ये दिसत आहे की बाईकपण रस्त्यावर घासली गेली आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर @jn_hoda या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि (bike)व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी चांगलीच अद्दल घडली असे म्हटले आहे. एकाने अशा लोकांसोबत असेच घडले पाहिजे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने अलीकडची पिढी या रिल्सच्या नादात आपला जीव गमावून बसणार आहे असे म्हटले आहे. तर तिसऱ्या एकाने अशा लोकांकडून भारी भक्कम दंड घेतला पाहिजे असे म्हटले आहे. सध्या हा भयावह व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा :
विशालकाय माशाने चक्क जिवंत माणसाला गिळलं, अर्धे शरीर आत तर अर्धे बाहेर… Video Viral
सेलमध्ये या 5 स्मार्टफोन्सवर मिळणार आकर्षक डिल्स, ऑफर्स पाहून व्हाल हैराण
राष्ट्रवादीला संधी द्या; हातकणंगलेचा स्वर्ग करू व चेहरा बदलू – मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास