भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार स्मृती मानधनासाठी नोव्हेंबरचा महिना अत्यंत खास ठरला होता. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारतीय महिला संघाने वर्ल्डकप जिंकून इतिहास रचला, तर 23 नोव्हेंबरला स्मृतीच्या वैयक्तिक आयुष्यातील आनंदाचा क्षण होता – तिने तिच्या स्वप्नातील राजकुमार, संगीतकार पलाश मुच्छल याच्यासोबत लग्न करणार होती.परंतु, 23 नोव्हेंबर रोजी अचानक परिस्थिती बदलली. लग्न काही तासांवर आले असताना स्मृतीचे वडील, श्रीनिवास मानधना यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांना सांगलीतील रुग्णालयात दाखल करावे लागले. स्मृतीने वडिलांना बरं वाटल्याशिवाय लग्न करणार नाही अशी ठाम भूमिका घेत, परिणामी लग्न पुढे ढकलावे(Instagram) लागले.

यामुळे सांगलीत आधीच सुरू असलेल्या हळदी, मेहंदी, संगीत आणि इतर विधींचा थाट अचानक थांबला. भारतीय संघातील मैत्रिणी, नातेवाईक आणि मित्रपरिवार लग्नासाठी उपस्थित होते. पुढे, स्मृतीच्या सोशल मीडिया(Instagram) अकाऊंटवर प्री-वेडिंग फोटो हटवल्यामुळे अनेक अफवा पसरल्या. काहींनी असा दावा केला की स्मृतीने पलाशला अनफॉलो केले, तर काहींनी रेडिट आणि ट्विटरवर फोटो आणि चॅट्स शेअर करून गोंधळ वाढवला.तथापि, अधिक तपासणीवर हे स्पष्ट झाले की या अफवा पूर्णपणे खोट्या आहेत. स्मृती मानधना अद्याप पलाश मुच्छलला फॉलो करत आहेत आणि पलाशही स्मृतीला फॉलो करत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर पसरवलेली “अनफॉलो” आणि लग्न मोडल्याची चर्चा चुकीची असल्याचे उघड झाले आहे.

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न पुढील योग्य वेळेत आणि सुरक्षित परिस्थितीत होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

लाडकी बहीण योजना बंद होणार का? उपमुख्यमंत्री शिदेंनी केलं मोठं विधान; म्हणाले…

कोण आहे Mary D’Costa? जिने स्मृती-पलाशच्या नात्यात कालवले विष

रिकाम्या पोटी अंजीर चांगलं की बदाम, कशामुळे शरीर राहतं उबदार?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *