क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाला अवघे काही तास बाकी असताना स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने विवाह (wedding)पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. सांगलीत लग्नापूर्वीचे सर्व कार्यक्रम सुरु असताना या अचानक घडलेल्या घटनेने दोन्ही कुटुंबांमध्ये खळबळ उडाली. त्यातच पलाशचे कोरिओग्राफर मेरी डीकोस्टा यांच्यासोबतचे कथित फ्लर्टिंग चॅट्स समोर आल्यानंतर या जोडप्याचे लग्न होणार की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला होता.

आता पलाशच्या आई अमिता मुच्छल यांनी या सर्व चर्चांना विराम देणारे महत्त्वाचे विधान केले आहे.
“लवकरच लग्न होईल” — अमिता मुच्छल
‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या,
“स्मृती आणि पलाश दोघांनाही प्रचंड मानसिक त्रास झाला आहे. पलाशचे स्वप्न होते की धूमधडाक्यात आपल्या नवरीचे स्वागत करावे. आम्ही घर सजवून पूर्ण तयारी केली होती. पण परिस्थिती(wedding) अशी निर्माण झाली की लग्न पुढे ढकलावे लागले. लवकरच सर्व काही सुरळीत होईल आणि दोघांचे लग्न नक्की होईल.”
त्यानंतर त्या म्हणाल्या की स्मृतीच्या वडिलांशी पलाशचे नाते खूप खास आहे.
“स्मृतीपेक्षाही पलाश त्यांच्याशी जास्त जवळचा आहे. त्यांच्या तब्येतीचा त्रास कळताच लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय पलाशनेच आधी घेतला होता.”
पलाशलाही करावा लागला रुग्णालयात दाखल
घटनाक्रम सांगताना अमिता मुच्छल पुढे म्हणाल्या –
“स्मृतीच्या वडिलांना रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर पलाश इतका तणावात होता की त्याला देखील हलकासा अटॅकसारखा त्रास झाला. आम्ही त्याला बाहेर जाऊ दिलं नाही. चार तास तो रुग्णालयात होता, आयव्ही ड्रीप लावण्यात आली, ईसीजी झाले… आता तो बरा आहे.”
स्मृतीचे वडील सध्या उपचाराखाली
स्मृतीच्या वडिलांबद्दल त्या म्हणाल्या,
“ते खूप आनंदात होते, इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकत होते, कार्यक्रमात नाचत होते. पण वरात सजवण्याची तयारी चालू होती तेव्हा अचानक प्रकृती ढासळली. लपवण्याचा प्रयत्न केला पण वेदना वाढल्या आणि आम्हाला अॅम्ब्युलन्स बोलवावी लागली.”
दोन्ही कुटुंबांचा एकच निर्णय
दोन्ही कुटुंबांनी एकमताने ठरवले की स्मृतीच्या वडिलांची प्रकृती पूर्णपणे सुधारल्याशिवाय लग्न करायचे नाही.सध्या ते हळूहळू बरे होत असून पलाश आणि स्मृतीही कुटुंबासोबत मानसिक तणावातून सावरत आहेत.

हेही वाचा :
6 मिनिटे जग भरदिवसा बुडणार अंधारात, 100 वर्षात पहिल्यांदाच चमत्कार, तापमानही झपाट्याने..
शिंकताना आपले डोळे आपोआप का बंद होतात…
प्लास्टिकच्या पिशवीपासून बनवला शॉवर अन् चिमुकल्याचा जल्लोष पाहून इंटरनेटही झालं भावूक, पहा VIDEO