शिंक येणे ही शरीराची नैसर्गिक क्रिया आहे. नाकात धूळ, प्रदूषण, बॅक्टेरिया किंवा इतर कोणताही बाहेरील कण गेल्यावर शरीर त्याला बाहेर काढण्यासाठी जोरात हवा बाहेर टाकते. यालाच विज्ञानात ‘sneeze reflex’ म्हणतात.अनेकांना वाटते की शिंकताना डोळे उघडे ठेवले तर डोळे दुखू शकतात किंवा बाहेर पडू शकतात. पण विज्ञान सांगते की, ही केवळ एक गैरसमज आहे. शिंकताना डोळे आपोआप(automatically)बंद होतात कारण हे एक ‘protective reflex’ आहे. शिंकताना लाखो सूक्ष्म कण, बॅक्टेरिया आणि लाळेचे थेंब जोरात बाहेर फेकले जातात. जर डोळे उघडे असतील, तर हे कण थेट डोळ्यांवर आदळू शकतात आणि संक्रमणाचा धोका वाढतो.

शिंक येण्यामागे चेहऱ्यावरील ट्राइजेमिनल नर्व महत्त्वाची भूमिका बजावते. ही नस नाक, डोळे, जबडा आणि चेहऱ्याच्या संवेदना नियंत्रित करते. नाकात त्रास जाणवला की मेंदू शिंक देण्याचा सिग्नल पाठवतो आणि डोळे बंद करण्याचा आदेशही दिला जातो. म्हणूनच डोळे उघडे ठेवून शिंक देणे जवळपास अशक्य असते.

तसेच शिंक थांबवण्याचा प्रयत्न करणे धोकादायक ठरू शकते. नाक, कान आणि डोळ्यांवर अनावश्यक दबाव येतो आणि कधी कधी रक्तवाहिन्या फुटण्याचा धोका(automatically) देखील वाढतो. त्यामुळे तज्ज्ञ शिंक थांबवू नका, ती नैसर्गिकरित्या बाहेर येऊ द्या, असे सल्ला देतात.

हेही वाचा :

लग्न टळल्यानंतर स्मृतीने उचललं मोठं पाऊल, इन्स्टावर पलाशला केलं अनफॉलो

लाडकी बहीण योजना बंद होणार का? उपमुख्यमंत्री शिदेंनी केलं मोठं विधान; म्हणाले…

कोण आहे Mary D’Costa? जिने स्मृती-पलाशच्या नात्यात कालवले विष

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *