देशभरातील वातावरणामध्ये मागील काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहेत.(country) नोव्हेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर काही दिवस कडाक्याची थंडी जाणवली, मात्र आता पुन्हा एकदा वातावरणात उकाडा वाढला आहे. याच दरम्यान भारतीय हवामान विभागाने अत्यंत महत्त्वाचा इशारा जारी करत चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे. समुद्रातून येणारे हे वादळ पुढील काही तासांत अधिक तीव्र होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.भारतीय सागरी किनाऱ्यावरील कमी दाबाचे पट्टे सतत सक्रिय होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून हवामानात अस्थिरता निर्माण झाली आहे. दक्षिण-पश्चिम बंगालचा उपसागर आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीजवळ नवे कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे.

हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार हे प्रणाली चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते. त्यामुळे देशातील अनेक किनारी भागांना तातडीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू ,आंध्र प्रदेश आणि पुडुचेरीमध्ये हवामान विभागाने येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.(country) बंगालच्या खाडीत निर्माण झालेले वादळ तीव्र होत असून पुढील दोन ते तीन दिवस आंध्र प्रदेशच्या किनारी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता असून नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
चैन्नई, कांचीपुरम, तिरूवल्लूर, विल्लुपुरम या भागांमध्ये पावसाची तीव्रता अधिक राहणार आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.(country) वादळाचा वेग वाढण्याची शक्यता लक्षात घेता समुद्र किनाऱ्याजवळील मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.चक्रीवादळाचा थेट फटका महाराष्ट्राला बसणार नसला तरी त्याच्या प्रभावामुळे राज्यात पुन्हा एकदा ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता वाढली आहे. विशेषतः कोकण किनारपट्टीवर पावसाची रिपरिप आणि वाऱ्यांचा वेग जाणवू शकतो.

हवामान विभागाच्या मते, राज्यात दोन दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. (country) काही भागात अचानक पावसाचे ढग परत येताना दिसू शकतात.या चक्रीवादळाची दिशा उत्तर-पश्चिमेकडे असून ते सुमारे 17 किमी प्रतितास वेगाने पुढे सरकत आहे. 30 नोव्हेंबर 2025 च्या सकाळच्या सुमारास हे वादळ उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकेल असा अंदाज व्यक्त केला आहे. वादळाच्या आगमनापूर्वीच स्थानिक प्रशासनाकडून बचाव व सुरक्षिततेची सर्व तयारी पूर्ण केली जात आहे.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींचं सर्वात मोठं टेन्शन दूर, आदिती तटकरेंकडून योजनेबाबत
लक्ष द्या! नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाची वेळ बदलली; निवडणूक
अंजली दमानिया अजित पवारांविरोधातील 21 किलो