दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया घरच्या मैदानावर खेळूनही धोक्यात आली आहे.(India)भारतीय चाहत्यांना या सीरीजमध्ये वर्चस्व गाजवण्याची अपेक्षा होती, मात्र प्रत्यक्षात पूर्णतः उलट चित्र दिसत आहे. टीम इंडियाच्या फलंदाजांनी या सीरीजमध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी केली असून पराभवा पेक्षा मोठं संकट भारतीय संघावर ओढवलं आहे.गुवाहाटी आणि इतर सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांनी संपूर्ण सीरीजमध्ये संघर्ष केल्याचं पाहायला मिळालं. दोन कसोटीतील तीन डावात भारत फक्त एकदाच 200 धावांच्या पुढे जाऊ शकला आहे.

त्यातही आश्चर्याची बाब म्हणजे या मालिकेत भारतीय संघातील एका फलंदाजानेही अद्याप शतक झळकावलेले नाही. केवळ यशस्वी जैस्वालने एक अर्धशतक नोंदवले असून तो 58 धावांवर बाद झाला. भारतीय संघातील टॉप ऑर्डरपासून मिडल ऑर्डरपर्यंत सर्व फलंदाज अपयशी ठरले आहेत.(India)या मालिकेत केएल राहुल सर्वाधिक 39 धावा, तर ऋषभ पंत 27 धावांवर आहे. रवींद्र जाडेजाचाही सर्वोच्च स्कोर 27 आहे. ध्रुव जुरेल आणि इतर फलंदाज एका डावात 20 धावांपर्यंतही पोहोचू शकलेले नाहीत.वॉशिंग्टन सुंदर हा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला असून त्याने तीन डावात 108 धावा केल्या आहेत.
परंतु त्याच्याशिवाय भारतातील एकही फलंदाज तीन डावात मिळून 100 धावाही करू शकलेला नाही, हे भारतीय फलंदाजीचे ढासळलेले चित्र दर्शवतं.(India) जर गुवाहाटी कसोटीत एका भारतीय फलंदाजानेही शतक झळकावलं नाही, तर घरच्या मैदानावरील कसोटी मालिकेत भारताकडून शतक न होण्याची ही 30 वर्षांतली पहिली वेळ ठरेल.भारतीय फलंदाजी अपयशी ठरत असताना दक्षिण आफ्रिकेने मात्र खेळपट्टीचा अचूक वापर करत धावा केल्या. गुवाहाटी कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या सेन्युरन मुथुसामीने 206 चेंडूंत 109 धावांची शतकी खेळी करीत भारतीय गोलंदाजांच्या योजनांवर पाणी फेरले.

त्याने 7व्या क्रमांकावर येत 10 चौकार आणि दोन षटकारांसह शानदार इनिंग साकारली. (India)या मालिकेत टीम इंडिया सध्या पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. जर भारतीय संघाने पुढील आणि शेवटची इनिंग चांगली खेळली नाही, तर केवळ सीरीज हरण्याचाच धोका नाही, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील स्थितीही धोक्यात येऊ शकते.भारतीय संघाकडे आता स्वतःची प्रतिष्ठा आणि सीरीज वाचवण्यासाठी केवळ एकच संधी उरली आहे.
हेही वाचा :
पलाश मुच्छलचं आणखी एक कांड आलं समोर! आता ‘या’ महिलेसोबत
भाऊ मानल्याचं नाटक, पुणेकर महिलेचे कोल्हापूरच्या 47 वर्षीय
राज्यात पुढील २ दिवस कसं असणार हवामान? जाणून घ्या हवामान