मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष, बंधू धाय (warning)मोकलून रडला तर जरांगेंचा थेट इशारादेशमुख कुटुंबियांनी न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास दर्शवत, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या आज प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कुटुंबीयांनी न्यायासाठी पुन्हा एकदा आवाहन केलं आहे. संतोष देशमुख यांच्या भावाने, आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत आपण लढत राहू अशी भावना व्यक्त केली. येत्या १२ तारखेला आरोप निश्चिती होणार असून, त्यानंतर लवकर न्याय मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

देशमुख कुटुंबियांनी न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास दर्शवत,(warning) आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. संतोष देशमुख यांच्या आज प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मस्साजोग येथे जरांगे पाटील, अंबादास दानवे, बजरंग सोनावणे, संदीप शिरसागर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. न्यायाच्या या लढाईत सोबत असलेल्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन धनंजय देशमुख यांनी केले आहे. कुटुंबाचे दुःख मोठे असून, त्यांना लवकरात लवकर न्याय मिळणे आवश्यक आहे.

9 डिसेंबर 2024 रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला,(warning) कौर्याची परिसीमा गाठणाऱ्या या क्रुर हत्येने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. आरोपींच्या अटकेसाठी राज्यभरात मोर्चे, आंदोलने झाली. याप्रकरणात एकूण आठ आरोपींचा समावेश होता, ज्यामध्ये सात जणांना अटक करण्यात आली आहे. वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतिक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे अशी अटकेत असलेल्यांची नावे आहेत, तर कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे.

मी आत कोणतंही पाऊल उचलण्याच्या तयारीत; (warning)संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख असं का म्हणाले?सरपंच संतोष देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मस्सजोगमध्ये कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजल्यापासून कीर्तनाचा कार्यक्रम आहे. त्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील देखील देशमुख कुटुंबाची भेट घेणार आहेत. दिवसभरात जिल्ह्यातील अनेक नेते मस्साजोगला भेट देणार आहेत.

आज माध्यमांशी बोलताना संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना अश्रु अनावर झाले.(warning)आमचा निष्पाप माणूस गेला आहे. त्याच कुटुंब उघड्यावर पडलं असेल याविषयी खंत व्यक्त करण्यापेक्षा 22 ,25 गुन्हे असलेला कुख्यात आरोपीची आठवण येणं म्हणजे जिल्ह्याच दुर्दैव आहे, असं म्हणत त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. तसेच जोपर्यंत सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा मिळत नाही तोपर्यंत लढत राहणार आहे, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

वडिलांच्या हत्येला 1 वर्ष झाले तरी आजही आम्ही न्यायाच्या अपेक्षेत आहोत. आरोपी आहेत, सर्व पुरावे आहेत तरीही या खटल्यात उशिर का होत आहे? हे समजत नाही. आमची सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा. समाजाने दिलेली साथ यामुळेच हा लढा उभा राहिला. आठवणींना कोणताही दिवस नसतो. मी त्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न नक्की पूर्ण करेन, पण ते माझ्यासोबत नसतील, याचं वाईट वाटतं. असं म्हणत वैभवी देशमुखलाही अश्रु अनावर झाले.

आज संतोष देशमुखांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या(warning) दिवशी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर जहरी टीका केली आहे. तसेच देशमुख खून प्रकरणात धनंजय मुंडेंसह अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांना सहआरोपी करा, अशी मागणीही जरांगे यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असंही त्यांनी सांगितलं. धन्या आडकाठी आणतोय. आरोपी सुटण्यासाठी प्रयत्न करत असले तर त्यांच्या मुंडक्यावर पाय देवू अशा शब्दांत जरांगे यांनी धनंजय मुंडेंना इशारा दिला आहे.

हेही वाचा :

स्मृती मंधाना–पलाश मुच्छलच्या लग्नाची नवीन तारीख काय? 

राज्यातील ‘या’ जिल्हा परिषद व महापालिकांचे नव्याने आरक्षण सोडत होणार!

क्रिकेटप्रेमींनो! भारत–पाकिस्तान महामुकाबला ‘या’ दिवशी रंगणार

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *