सांगोल्यात शहाजी बापूं पाटील यांच्या कार्यालयावर धाड पडली.(election) LCB आणि निवडणूक आयोगाच्या पथवाकडून यावेळी रेकॉर्डिंग सुद्धा करण्यात आली. शहाजी बापूंच्या कार्यालयावर धाड पडल्याने एकच खळबळ उडाली. यावर देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. हेच नाही तर काल रात्री सांगोल्यामधील आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचार कार्यालयाची तपासणी निवडणूक अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांच्या सांगण्यावरून ही कारवाई झाली असल्याचा गंभीर आरोप शहाजी बापू पाटील यांनी केला. सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाला आपला पराजय दिसत असल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने त्यांनी ही कारवाई केली आहे, असे थेट शहाजी बापू यांनी म्हटले.

हेच नाही तर कारवाईनंतर शहाजी बापू यांना अश्रू अनावर झाले. (election)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही सगळी माहिती देणार असल्याचे त्यांनी म्हटले. शहाजी बापू यांच्या कार्यालयावर धाड पडल्याच्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, सत्तेत आहे की, बाहेरून आहे यावर धाड ठरत नसते. माझीही गाडी तपासली जाते.त्यामुळे यामध्ये काही सत्ताधारी आणि विरोधक अशा गोष्टी नसतात. तक्रारी आल्यानंतर आमच्याही कार्यकर्त्यांकडेही तपासणी झाल्या आहेत. LCB आणि निवडणूक आयोगाच्या पथवाकडून शहाजी बापूंच्या कार्यालयावर धाड पडल्यानंतर त्यांनी थेट भाजपावरच निशाणा साधला.

यापूर्वी आपण निवडणुकीवेळी भाजपाला कायमच मदत केल्याचेही त्यांनी सांगितले आहे.(election)आता शहाजी बापूं यांच्या कार्यालयावर पडलेल्या धाडीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देत स्पष्टपणे म्हटले की, धाड पडताना सत्ताधारी किंवा विरोधक बघितले जात नाही. तक्रारी आल्यानंतर ही कारवाई केली जाते. धाड पडल्यानंतर शहाजी बापूं यांनी गंभीर आरोप करत भाजपाकडे बोट दाखवले होते.

हेही वाचा :

स्मृती मंधाना–पलाश मुच्छलच्या लग्नाची नवीन तारीख काय? 

राज्यातील ‘या’ जिल्हा परिषद व महापालिकांचे नव्याने आरक्षण सोडत होणार!

क्रिकेटप्रेमींनो! भारत–पाकिस्तान महामुकाबला ‘या’ दिवशी रंगणार

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *