रोज लाखो लोक स्वतः च्या खाजगी वाहनांनी प्रवास करतात. (prices)अनेकजण ऑफिसला जाताना किंवा कॉलेजला जाताना कार किंवा बाईक घेऊन जातात. त्यामुळे रोज पेट्रोल डिझेलचा खर्च करावा लागतो. सध्या पेट्रोल डिझेलचे दर खूप वाढले आहेत. त्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला फटका बसत आहे. परंतु आता सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.ओपेक देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज तब्बल ५.४७ लाख बॅरलने हे उत्पादन वाढवले जाणार आहे. .यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाची उपलब्धता वाढणार आहे. याचाच परिणाम असा होईल की, पेट्रोल डिझेल आणि इंधनाच्या किंमती कमी होतील.

 

रशिया, सौदी अरेबियासह अनेक देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. (prices) त्यामुळे भारताला फायदा होणार आहे. भारत हा कच्चे तेल आयात करतो. त्यातील सर्वाधित तेल हे रशियाकडून घेतले जाते. त्यामुळे जर उत्पादन वाढले तर कच्च्या तेलाच्या किंमती आपोआप कमी होतील. या एका निर्णयामुळे भारताला खूप फायदा होऊ शकतो. पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होऊ शकतात त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल.

आजचे पेट्रोल डिझेलचे दर
आज मुंबईत पेट्रोलची किंमत १०३.५० रुपये आहेत. (prices) डिझेलचे दर प्रति ९०.०३ लिटर
पुण्यात पेट्रोलचे दर १०४.१० रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलचे दर ९०.७१ रुपये आहेत.
ठाण्यात पेट्रोलचे दर १०३.६४ रुपये आहे तर डिझेल ९०.१६ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे.
साताऱ्यात १ लिटर पेट्रोलची किंमत १०४.७० रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.२१ रुपये आहे.

हेही वाचा :

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *